पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट करीत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यापाठोपाठ पुण्यात पत्रकारांनी विचारणा केली असता मी तुर्त अर्धेच बोललो आहे. योग्य वेळी उरलेलंही सांगेन, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना पुन्हा एकदा लक्ष्य केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या गोप्यस्फोटावरील चर्चा अद्याप सुरूच असताना त्यांनी दुसरा बॉम्बगोळा टाकला आहे. मी बोललो, ते सत्यच असल्याचे ते म्हणाले. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण, मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही. पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेल जे काही अर्धे आहे, ते दुसरी योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धदेखील बोलेल, असे विधान देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस आणखी काय बोलणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मोर्चेबांधणीसाठी फडणवीस बुधवारी पुण्यात आले होते. यादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर अनेकांच्या भेटीगाठीही घेतल्या.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1625895162105720834?s=20
DYCM Devendra Fadnavis Big Statement on Morning Swearing Ceremony
Politics