नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात हळूहळू कोरोना संसर्ग वाढत आहे. अन्य राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजच तातडीने बैठक घेतली आहे. राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, राज्यातील कोरोना स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात येईल. टास्क फोर्समध्ये तज्ज्ञांचा समावेश असेल. हा टास्क फोर्स कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्य सरकारला विविध प्रकारच्या सूचना व मार्गदर्शन करेल. देशतील कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत केंद्र सरकारने विविध निर्देश दिले आहेत. बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग कऱण्यासह विविध उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.
DYCM Devendra Fadanvis on Corona Mask Compulsory
Covid 19 Maharashtra Winter Assembly Session Nagpur