बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साखर कारखान्यांबाबत अजित पवार यांचे मोठे विधान

by India Darpan
मे 23, 2022 | 4:43 pm
in राज्य
0
baramati1

 

बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फक्त ऊस लागवड करण्याऐवजी पाण्याची उपलब्धता पाहूनच पिके घ्यावीत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती सहकारी साखर करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी सर्व गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत. यावर्षी मराठवाड्यात खूप प्रमाणात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. शासनाने १ मेपासून गाळप होणाऱ्या ऊसाला टना मागे २०० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले आहे. पुढील वर्षांपासून साखर कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोऱ्हाळे बु. स्थलांतरीत शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले की, शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, तसेच बँकेने शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेने रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करावी. या भरतीमध्ये जिल्ह्यातील गरजू मुला-मुलींना गुणवत्तेनुसार संधी मिळणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी २५ लाखापर्यंतचे कर्ज देत आहे. नाबार्डची परवानगी घेऊन कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोऱ्हाळे बु. शाखा साडेतीन कोटी रुपये नफ्यामध्ये असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बॅंकेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक काम करून ग्राहकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बँकेत लॉकरच्या सुविधेसोबत सुरक्षिततेची काळजी घेतली गेली पाहिजे, असेही श्री.पवार यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, दि माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, कोऱ्हाळे बु. चे सरपंच रविंद्र खोमणे, कोऱ्हाळे खु. चे सरपंच गोरख खोमणे, ग्रामस्थ उपस्थित होते.

सिद्धिविनायक हायटेक रोप वाटिका व शेडनेट हाऊसचे उद्घाटन

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्यीत हायटेक रोपवाटिका व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कोऱ्हाळे बु. येथील शेतकरी अजित पोमणे आणि भारती पोमणे यांनी उभारलेल्या शेडनेट हाऊस आणि रोपवाटिकेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप आदी उपस्थित होते. हा स्तुत्य उपक्रम असून रोपवाटिकेचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा. अशा प्रकारचे व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संभाजीराजेंना पाठिंबा न देणे शिवसेनेला फायदेशीर ठरेल की नुकसानीचे?

Next Post

रेस्टॉरंट व्यवस्थापनाचे सॉफ्टवेअर ‘पेटपूजा’ आता मराठीतही

Next Post
Logo Petpooja

रेस्टॉरंट व्यवस्थापनाचे सॉफ्टवेअर 'पेटपूजा' आता मराठीतही

ताज्या बातम्या

Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011