शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! तुम्ही रोज पित असलेले पाणी शुद्ध आहे की अशुद्ध? बघा, केंद्र सरकार काय म्हणतेय…

by India Darpan
ऑगस्ट 13, 2022 | 5:21 am
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुमच्या घरात येणारे पाणी आणि तुम्ही पित असलेले पाणी शुद्ध आहे की अशुद्ध असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. त्याचे उत्तर केंद्र सरकारने दिले आहे. ते वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. आधुनिक काळात जगात सर्वात मोठा राक्षस म्हणजे प्रदूषण होय. जल प्रदूषण, वायू प्रदूषण व मातीचे प्रदूषण होय. पाणी म्हणजे जिवन होय. मात्र हे जीवनच विषारी बनू लागले आहे. आजच्या काळात पाणी अशुद्धच नव्हे तर विषारी बनू लागले आहे. देशातील पाण्याची गुणवत्ता झपाट्याने बिघडत असल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आता आपण जे पाणी पितो आहोत, ते विषारी आहे. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांत भूगर्भातील पाण्यांमध्ये विषारी घटक मिळत असल्याचे समोर आले आहे.

जल शक्ती मंत्रालयाच्या एका कागदपत्रानुसार, देशातल्या 80 टक्के जनतेला जमिनीतून पाणी मिळते. जर भूजलात मोठ्या प्रमाणात धोकादायक घटक सापडले तर त्याचा अर्थ ते पाणी विष झालेले आहे. राज्यसभेत सरकारतर्फे लोकसंख्येच्या वस्त्यांची संख्याही सांगण्यात आली. ज्या ठिकाणी पाण्याचे मूळ स्रोत हे प्रदूषित झालेले आहेत.

आकडेवारीनुसार, 671 क्षेत्रांत फ्लोराईड, 814 क्षेत्रांत आर्सेनिक, 14,079 क्षेत्रात आयर्न, 9930 क्षेत्रांत सलीनिटी, 517 क्षेत्रांत नायट्रेट आणि 111 क्षेत्रांत धातूंमुळे पाणी प्रदूषित झालेले आहे. प्रत्येक व्यक्ती दरदिवशी सरासरी 3 लिटर पाणी पितो असे मानण्यात येते. सरकारी आकडेवारी नुसार आरोग्यदायी राहण्यासाठी दररोज किमान 2 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

आपण जर दररोज 2 लिटर पाणी पित असाल तर याचा अर्थ तुमच्या शरिरार काही प्रमाणात विष जात आहे. सरकारने हेही स्पष्ट केले की, शहरांच्या तुलनेत गावांत ही समस्या अधिक तीव्र आहे. देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अजूनही गावांमध्येच राहते. तिथे पाण्याचे स्रोत हे हँडपंप, विहिरी, तलाव, नद्या हेच आहेत. या ठिकाणी येणारे पाणी थेट जमिनीतून येते. याच्या व्यतिरिक्त हे पाणी स्वच्छ करण्याची कोणतीही प्रक्रिया अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांना विषारी पाणी प्य़ावे लागत आहे.

केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले की, पाणी हा राज्यांचा विषय आहे. त्यामुळे लोकांना पिण्यासाठी चांगले पाणी उपलब्ध करुन देणे ही राज्यांची जबाबदारी आहे. मात्र तरीही स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना सुरु करण्यात आल्या असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. 21 जुलै रोजी सरकारने लोकसभेत माहिती दिली होती की, ऑगस्ट 2021 मध्ये जल जीवन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीम भागातल्या प्रत्येक घरात नळाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारने दिलेल्या लेखी उत्तरानुसार देशातील 19.15 कोटी ग्रामीण घरांपैकी, आत्तापर्यंत 9.81 कोटी घरांमध्ये नळातून पाणी देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पिताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Drinking Water Union Government Purity
Water Supply Contamination

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पत्नीची हत्या करुन मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला; असे झाले उघड

Next Post

मुलांची सर्वाधिक काळजी कोण घेऊ शकते? आई की वडील की अन्य कुणी? उच्च न्यायालय म्हणाले…

Next Post
mumbai high court

मुलांची सर्वाधिक काळजी कोण घेऊ शकते? आई की वडील की अन्य कुणी? उच्च न्यायालय म्हणाले...

ताज्या बातम्या

accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा १० लाखाच्या ऐवजावर डल्ला…वडाळा पाथर्डी मार्गावरील घटना

मे 9, 2025
GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011