रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डीआरडीओने १० उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित…

by India Darpan
जून 8, 2025 | 6:54 pm
in संमिश्र वार्ता
0
PICV8YK

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सरकारच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागासह सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्याच्या दृष्टिकोनानुसार, महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे स्थित डीआरडीओची प्रयोगशाळा वाहन संशोधन आणि विकास संस्थेने (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीइ) नऊ प्रणालींच्या तंत्रज्ञानाचे 10 उद्योगांना हस्तांतरण करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचे परवाना करार 7 जून 2025 रोजी व्हीआरडीई येथे आयोजित कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव व डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

तसेच, व्हीआरडीईने पुण्यातील सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधनासाठी सामंजस्य करार केला आहे.

या प्रसंगी बोलताना डॉ. कामत यांनी “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान स्वदेशी प्रणालींच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डीआरडीओ आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले. तसेच, उद्योगांनी भविष्यकालीन वाढीच्या क्षमतेसाठी आधीच नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भूमी आधारित प्रणाली व शस्त्र मंचासाठी उच्च दर्जाचे तांत्रिक उपाय प्रदान करण्यासाठी व्हीआरडीईच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

या कार्यक्रमास डीआरडीओचे प्रमुख वैज्ञानिक व शस्त्रसज्जता व युद्ध अभियांत्रिकी गटाचे महासंचालक प्रा. (डॉ.) प्रतीक किशोर, व्हीआरडीईचे संचालक जी. राममोहन राव आणि इतर वरिष्ठ वैज्ञानिक तसेच उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात इतका पाऊस…तर मुंबई शहर जिल्ह्यात काल सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

Next Post

रिक्षा प्रवासात महिलेचे पावणे दोन लाख रूपयाचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास…

Next Post
crime1

रिक्षा प्रवासात महिलेचे पावणे दोन लाख रूपयाचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास…

ताज्या बातम्या

11111111

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 8, 2025
crime1

रिक्षा प्रवासात महिलेचे पावणे दोन लाख रूपयाचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास…

जून 8, 2025
PICV8YK

डीआरडीओने १० उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित…

जून 8, 2025
rainfall alert e1699421697419

राज्यात इतका पाऊस…तर मुंबई शहर जिल्ह्यात काल सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

जून 8, 2025
nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011