गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संधी दवडू नका! ‘ड्रॅगनफ्रुट’ची लागवड करा अन् हा लाभ मिळवा

by India Darpan
जुलै 28, 2021 | 4:47 pm
in संमिश्र वार्ता
0
dragon fruit

मुंबई – कृषि विभागाने सन २०२१-२२ वर्षांपासून एकात्मिक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ड्रॅगनफ्रुट (कमलम) लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले असून या फळपिकाची लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

ड्रॅगनफ्रुट हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ असून भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मूल्य इत्यादी बाबी लक्षात घेवून फलोत्पादन विकास अभियानातुन ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चीत केले आहे.

ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषकतत्व आणि ॲन्टीऑक्सीडंन्टमुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. या व्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शीयम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकुन राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

dragon fruit1

ड्रॅगनफ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी जमीनीची पुर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मीटर x 3 मीटर ,3 मीटर x 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदुन खड्याच्या मधोमध सिमेंट कॉक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेंट कॉक्रीट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

ड्रॅगनफ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय असून याकरीता 4 लाख प्रति हेक्टर प्रकल्पमुल्य ग्राह्य धरुन 40 टक्के रक्कम 1 लाख 60 हजार अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तीसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे.

अधिकाधिक शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान उद्या देशातील शिक्षक, विद्यार्थ्यांना संबोधित करणार, हे आहे कारण

Next Post

स्पर्धा परीक्षार्थ्यांनो इकडे लक्ष द्या; राज्य सरकारने MPSC साठी घेतला हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
mpsc

स्पर्धा परीक्षार्थ्यांनो इकडे लक्ष द्या; राज्य सरकारने MPSC साठी घेतला हा मोठा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011