गुरूवार, ऑक्टोबर 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेख: भारतीय घटनेचे शिल्पकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर

डिसेंबर 6, 2021 | 12:23 pm
in इतर
0
dr babasaheb ambedkar

बाळासाहेब सोनवणे, नाशिक
थोर विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, कृतिशील राजकारणी, उत्तम संसदपटू, अभ्यासू विचारवंत,सखोल चिकित्सक, संपादक, उत्तम पत्रकार,उत्तम लेखक, उत्तम वक्ते,जलतज्ञ, महानकायदेपंडित, संस्कृत महाकाव्याचानायक, प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले थोरव्यक्तिमत्व, थोर समाज सुधारक, थोरशिक्षणतज्ञ, आदर्श विद्यार्थी, राजनीतीतज्ञ असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आज ६ डिसेंबर रोजी त्यांचा महापरिनिर्वाण दिवस हा स्मृतिदिन म्हणून आयोजित केला जातो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी मागोवा.

लेखक - बाळासाहेब सोनवणे, नाशिक
लेखक – बाळासाहेब सोनवणे, नाशिक

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे रामजी होते. मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. त्यांचे वडील लष्करात सुभेदार म्हणून नोकरीस होते पुढे येते सातारा येथे स्थायिक झाल्याने त्यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे प्राथमिक ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दापोली, सातारा व मुंबई येथे झाले. १९०७ सली मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. बालपणापासूनच अस्पृश्यतेचे चटके बसले होते. इसवी सन १९१२ मध्ये ते एलफिस्टन कॉलेजमधून बीए ची परीक्षा उत्तीर्ण झाले. इस १९१३ मध्ये सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक साह्य केल्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून इस १९१५ मध्ये एम.ए ची पदवी वइस १९१६ मध्ये पीएचडी पदवी मिळवली. पुढे कायदा व अर्थशास्त्रयांचे अध्ययन करण्यासाठी इंग्लंडला गेले. परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले.

इस १९२० मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. इस १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये भाग घेतला त्या सभेत राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा गौरव केला. १९२० मध्ये ‘‘दि प्रॉब्लेमऑफ रुपी‘‘ या त्यांच्या प्रबंधाबद्दल लंडन विद्यापीठाने डी.एस्सी. ही पदवी बहाल केली.१९२४ मध्ये भारतात अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘‘बहिष्कृतहितकारिणी सभा‘‘ या संस्थेची स्थापना केली १९२७ मध्ये त्यांची मुंबईप्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यास शिकवले. अस्पृश्य हे देखील याच देशाचे नागरिक आहेत आणि या देशावर इतर कोणाही इतकाच अस्पृश्यांना ही अधिकार आहे. असे त्यांनीठासून सांगितले.‘मनुस्मृती या हिंदू धर्मग्रंथाने जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे समर्थन करून सामाजिक विषमता व उच्च-नीच भेदभाव याचे समर्थन करणार्‍या या ग्रंथाचा प्रतीकात्मक निषेध म्हणून २५ डिसेंबर१९२७ रोजी मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले. अस्पृश्याना मंदिर प्रवेश नाकारला जात होता म्हणून नाशिक येथे आपल्या हजारो अनुयायांनी सोबत २ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रहकेला. उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांनावर्षानुवर्षे त्यांच्या हक्कापासून वंचितठेवले असले तरी यापुढे अस्पृश्य बांधव हा अन्याय सहन करणार नाहीते आपल्या न्याय हक्कासाठी प्रसंगीसंघर्ष देखील करतील आणि आपले हक्क मिळवलेल्या खेरीज स्वस्थ बसणार नाही आणि यातूनच अस्पृश्यांची अस्मिता जागी झाली. हिंदू धर्माने अस्पृश्यांना न्याय द्यावा याकरिता आंबेडकरांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले तरी हिंदूंच्या वृत्तीत फारसा फरकपडला नाही या अनुभवा वरून त्यांची खात्री पटली की अस्पृश्यांना सवर्ण हिंदू कधीच न्याय देणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या हजारो अनुयायांसह बौद्धधर्माची दीक्षा घेतली. या धर्मांतरामध्ये बौद्ध धर्माची निवड करण्यात देखील आंबेडकरांचे दूरदर्शीत्व व राष्ट्रहिताची तळमळ याचे दर्शन होते.

शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतक-यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिकस्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची. पीकपद्धती, पाणी उपलब्धता,बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीन धारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ,राज्यातील नद्यांच्या खोर्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. इस१९३० ते १९३२ या दरम्यान इंग्लंड मध्ये भरलेल्या गोलमेज परिषदांना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तेथे त्यांनी
अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. इस १९३२ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली. महात्मा गांधीजींचा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध होता त्यामुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे जाती निवाड्यातील या तरतुदीच्या विरोधात म.गांधीनी येरवडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले त्यांचे प्राण वाचावेत म्हणून डॉ. आंबेडकर तडजोडीला तयार झाले. त्यानुसार म.गांधी व डॉ.आंबेडकर यांच्यात २५
सप्टेंबर १९३२ रोजी एक करार झाला. हा करार ‘पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा शब्दात त्यांचा उचित गौरव केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं.नेहरू यांनी त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर केंद्रीय कायदामंत्री म्हणून जबाबदारी सोपवली. या नात्याने त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हिंदूकोड बिल तयार केले. त्यामुळे त्यांना आधुनिक ‘मनू’ असे ही म्हटले जाते.

अस्पृश्यांना शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांची प्रगती होऊ शकणार नाही हे बाबासाहेबांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी शिक्षण प्रसाराच्या कार्यातही लक्ष घातले होते त्यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेमार्फत दलित समाजातील तरुणव प्रौढ व्यक्तींसाठी रात्रशाळा चालविणेवाचनालय सुरु करणे यासारखे उपक्रम हातीघेतले होते. इस १९४७ मध्ये बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजेस सुरू करून दलित विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला न्याय हक्क मिळविण्यासाठी शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! असा मूलमंत्र दिला.

त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही उद्दिष्टे देऊन आपल्या भारत देशाची “न भूतो न भविष्यती” अशी फार मोठी सेवा केली आहे. या महान देशसेवेप्रति कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा योग साधत १४ एप्रिल १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना हा सन्मान दिल्यामुळे सन्मानाची महानता वाढली आहे. असा महान महामानव ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. या थोर विभूतीस कोटी कोटी प्रणाम!
बाळासाहेब दादा सोनवणे
उपशिक्षक, दे.ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेज गंगापूर ता. जि.नाशिक
मो. 80553 70977:

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जबरदस्त! भारताने कसोटीसह मालिका जिंकली; न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव

Next Post

दूरसंचार कंपन्या आता या ग्राहकांनाही देणार झटका; खिसा होणार हलका

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
Mobile phones

दूरसंचार कंपन्या आता या ग्राहकांनाही देणार झटका; खिसा होणार हलका

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011