मुंबई – ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हे कोरोना बाधित झाल्यानंतर उपचारासाठी ते मुंबई महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झाले आहे. महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम असून यावर माझा विश्वास आहे. म्हणूनच मी मुंबई मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे. सर्वसाधारणपणे सेलिब्रेटी हे खासगी रुग्णालयांना प्राधान्य देतात. मात्र, डॉ. कोल्हे त्यास फाटा देत सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. बघा त्यांचा व्हिडिओ
https://twitter.com/kolhe_amol/status/1428768996128481285