नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगविख्यात डॉक्टर रवी गोडसे यांचा नाशिक विषयीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नाशिक विषयीचा आहे. डॉ. गोडसे हे सध्या अमेरिकेत असतात. येत्या काही दिवसातच त्यांचे नाशिकमध्ये व्याख्यान होणार आहे. याचनिमित्ताने नाशिकला येण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. आणि हाच व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
१९मे ला व्याख्यान
डॉ. रवी गोडसे यांचे येत्या शुक्रवारी म्हणजेच १९ मे २०२३ रोजी नाशिकमध्ये व्याख्यान होणार आहे. वैद्यक शास्त्रातील विनोद असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. शतक महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे हे विशेष व्याख्यान होणार आहे.
देवमामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पचवटी येथे सायंकाळी हे व्याख्यान होणार आहे.
कोण आहेत डॉ. रवी गोडसे
डॉ. रवी गोडसे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ते यूएस मधील एक प्रॅक्टिसिंग फिजिशियन (डॉक्टर) तर आहेतच पण त्याच बरोबर एक लेखक, चित्रपट निर्माता आणि लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहेत. कोविड काळात कोविड विषयी माहिती वास्तविक, आशावादी, हलक्याफुलक्या पद्धतीने सादर करणारे त्यांचे “यूट्यूब चॅनल” खूपच लोकप्रिय झाले आणि या चॅनलने लाखो व्ह्यूज मिळवले यात अजिबात आश्चर्य नाही. पण डॉ. रवी गोडसे ची ओळख एवढ्यावरच थांबत नाही. ते एक लेखक आणि एक चित्रपट निर्माता देखील आहेत. त्याच्या चित्रपटांवरील प्रेमाखातर त्यांनी दोन वर्षे फिल्म स्कूलमध्ये जाऊन रीतसर शिक्षण घेतले. 2007 मध्ये ‘डॉ रवी अँड मिस्टर हाइड’ या त्याच्या पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण कॉमेडीसह त्यांनी व्यावसायिक चित्रपट बाजारात प्रवेश केला आणि त्यानंतर 2008 मध्ये ‘आय अॅम अ स्किझोफ्रेनिक अँड सो अॅम आय’ नामक एक मर्डर मिस्ट्री ही प्रदर्शित केली.
डॉक्टर, लेखक, चित्रपट निर्माता
डॉ. रवी गोडसे हे डोंबिवली, मुंबई येथे लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी प्रसिद्ध जी.एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि केईएम हॉस्पिटल, मुंबई येथून एमडी ची पदवी मिळवली. त्यानंतर ते यूएसएला गेले आणि त्यांनी पिट्सबर्ग विद्यापीठात आणखी एक मास्टर्स केले. त्यांचा डोंबिवली ते पिट्सबर्ग आणि एक यशस्वी डॉक्टर, लेखक, चित्रपट निर्माता होणे हा एक आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी प्रवास आहे.
बघा, त्यांचा व्हायरल व्हिडिओ
नाशिक, मराठी व्हिडिओ! pic.twitter.com/9YPyniz1LV
— DrRavi (@DrGodseRavi1) May 14, 2023
Doctor Ravi Godse Nashik Video Viral Social Media