मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या १५ ऑगस्टरोजी स्वातंत्र्य दिन आहे. त्यादिवशी त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्री हे ध्वजारोहण करीत असतात. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांसमवेत एकूण २० मंत्री आहेत. त्यातही खातेवाटप आणि पालकमंत्री अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे १५ ऑगस्टचे ध्वजारोहण नक्की कोण करणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आता यासंदर्भात शिंदे सरकारने अखेर निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ध्वजारोहण नक्की कोण करेल, याची यादीच शिंदे सरकारने प्रसिद्ध केली आहे. ती खालीलप्रमाणे
Districtwide Flag Hosting Honor List by Government