बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बहुचर्चित दिशा सालियनचा मृत्यू नेमका कसा झाला? CBI च्या अहवालातून झाले स्पष्ट

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2022 | 12:32 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Fh ghu agAAdZz7

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्या. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले होते. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले होते. आता मात्र या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दिशाची आत्महत्या झाल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं. नंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप झाला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर केला आहे. सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्याचा आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

प्रकरणात राजकीय आरोप
ही घटना घडल्यानंतर नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता, त्याला का वाचवण्यात आलं, सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं, असे आरोप नारायण राणेंकडून करण्यात आले होते. दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूतबाबत केलेलं पाप विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही. त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जातील, असा इशारा देखील नारायण राणेंनी दिला होता.

Disha Salian Death Case CBI Investigaion Report
Accidental

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित

Next Post

‘तो माझे तुकडे तुकडे करेन’, श्रद्धाने दोन वर्षांपूर्वीच केली होती पोलिसांकडे तक्रार

India Darpan

Next Post
Shraddha Murder

'तो माझे तुकडे तुकडे करेन', श्रद्धाने दोन वर्षांपूर्वीच केली होती पोलिसांकडे तक्रार

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011