मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कला दिग्दर्शक चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येपूर्वी ऑडियो रेकॉर्डिंगच्या क्लिप्स आणि एक चिठ्ठी मागे सोडली आहे. यामध्ये त्यांच्या आत्महत्येचे कारण दडलेले असून त्याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र यातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. त्यांनी एनडी स्टुडियो सरकारने ताब्यात घ्यावा, अशी विनंती आत्महत्येपूर्वी केलेली आहे.
नितीन चंद्रकांत देसाई हे बॉलिवूडमधील एक अत्यंत प्रतिष्ठित असे नाव होते. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट त्यांच्या कला दिग्दर्शनामुळे गाजले आहेत. देवदास, लगान, जोधा अकबरसारख्या चित्रपटांचा भव्य दिव्य सेट त्यांच्या कल्पकतेतून उभा झालेला होता. त्यांच्या एनडी स्टुडियोमध्ये जोधा अकबरचा सेट सर्वांचे लक्ष वेधायचा. पण बुधवारी अचानक त्यांच्या मृत्युचीच बातमी पुढे आली आणि अख्खे बॉलिवूड हादरले. एवढ्या कल्पक कला दिग्दर्शकाने आत्महत्या करावी, ही बाब कुणालाही पटलेली नाही. अशात देसाई यांनी चार उद्योजकांच्या नावांचा उल्लेख असलेल्या ११ ऑडियो क्लिपमध्ये आपल्या आत्महत्येचे कारण सांगितले आहे. यासोबतच त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवलेली आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री द्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांनी एनडी स्टुडियो ताब्यात घ्यावा, अशी विनंती केली आहे. स्टुडियोवर कर्ज असून तो कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडे जाण्याची भिती आहे. त्यामुळे सरकारने तो ताब्यात घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दोरीचा धनुष्यबाण
देसाई यांनी आत्महत्या करताना एका बाजुला दोरीच्या आधाराने तयार केलेला धनुष्यबाण लावून ठेवला आहे. यातून त्यांना काय सांगायचे आहे, हे पोलीस तपासानंतरच कळणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आडियोक्लिपमध्येही बऱ्याच गोष्टी उघडकीस येणार आहे. त्यात या धनुष्यबाणाचेही रहस्य उलगडणार आहे.
director nitin desai suicide case audio clips police investigation
Bollywood Movie Film Karjat ND Studio