शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात फरसाण कारखान्यावर धाड… तब्बल एक लाखाचे फरसाण जप्त

by India Darpan
ऑगस्ट 3, 2023 | 4:44 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230803 WA0266 e1691060505524

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासन नाशिक पथकाने तपोवन येथील मेसर्स देवीकृपा फूड प्रॉडक्ट्स या फरसाण उत्पादकाच्या कारखान्यावर धाड टाकत १ लाख ११ हजार ५५० रुपये किमतीचा साठा जप्त केला. या ठिकाणी अन्नपदार्थाचे विनापरवाना उत्पादन व विक्री करत असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून लसूण फरसाण, मद्रास फरसाण, लाल शेव, पिवळी शेव, भावनगरी शेवचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

या मोहिमेत एकूण पाच अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदरची धडक मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे. अन्न व्यवसायिकांनी फरसाण उत्पादकांनी आवश्यक परवाना घेऊन परिशिष्ट चार अंतर्गत तरतुदींचे पालन करून व्यवसाय करावा. तसेच उत्पादन साठवून वाहतूक व विक्री आरोग्यदायी वातावरणात करण्याबाबत निर्देश प्रशासनाने दिले.

यावेळी फरसाण उत्पादकांनी अन्नपदार्थात भेसळ करू नये, भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल तसेच मेसर्स देवी कृपा फूड प्रॉडक्ट्स या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पेढीस ज्या विक्रेत्यांनी कच्चे अन्नपदार्थ विक्री केले आहेत. त्यांच्यावर देखील नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहनही करण्यात आले. फरसाण खरेदी करताना लेबल वरील मजकूर तपासून खरेदी करावे व पक्के बिल घ्यावे भेसळयुक्त फरसाण किंवा इतर अन्नपदार्थ संबंधी माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क करावा ही कारवाई संजय नारागुडे (सह आयुक्त नाशिक विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली मनीष सानप (सहाय्यक आयुक्त (अन्न)) अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर व अविनाश दाभाडे (गुप्त वार्ता शाखा) यांनी केली.

Nashik FDA Farsan Company Raid Adulteration

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हाय रे दुर्दैव… या शहराला होतोय तब्बल २२ दिवसांनी पाणी पुरवठा… ऐन पावसाळ्यातही प्रचंड हाल…

Next Post

आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंनी रेकॉर्ड केल्या ११ ऑडिओ क्लिप… अनेक बाबी केल्या उघड

Next Post
nitin desai

आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंनी रेकॉर्ड केल्या ११ ऑडिओ क्लिप... अनेक बाबी केल्या उघड

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011