दिंडोरी – दिंडोरी नगरपंचायतच्या दोन जागांसाठी ८३.५६ टक्के शांततेत मतदान झाले असून या प्रभागातील सहा उमेदवारांसह यापूर्वी १४ जागांसाठी झालेल्या मतदानातून ४२ उमेदवारांचे असे एकूण ४८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी १० वाजेपासून दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून तास दीड तासात चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्र ११ मध्ये ५८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ८७.३५ टक्के तर प्रभाग १६ मध्ये ८०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ८१.०५ टक्के मतदान शांततेत पार पडले दोन्ही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष तिरंगी चुरशीची लढत झाली. दोन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीत खालील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून बुधवार १९ रोजी सकाळी दहा वाजता दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे मतमोजणी साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नागेश येवले यांनी दिली.शिवाजीनगर येथील आदिवासी सांस्कृतिक भवन मध्ये मतमोजणी होणार आहे एकूण आठ टेबल मतमोजणी साठी राहणार असून प्रभाग १ ते ८ पहिल्या फेरीत तर प्रभाग ९ ते १६ ची दुसऱ्या फेरीत मतमोजणी होणार आहे. कोविडचे नियम पाळत केवळ लस घेतलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार असून विजयी मिरवणुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे एक ते दीड तासात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १ (सर्वसाधारण महिला) – रोहिणी भगवान गायकवाड(भाजपा), मिराबाई नारायण पारखे (अपक्ष), रत्नाबाई सुभाष बोरस्ते (शिवसेना) निर्मला कैलास मावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस),शिंदे मेघा केशवराव (अपक्ष)
प्रभाग क्रमांक २(सर्वसाधारण) – अविनाश बाबुराव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), रचना विक्रमसिंह राजे(भाजप), निलेश भाऊसाहेब शिंदे (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ३ (अनु.जमाती महिला)– कल्पना संतोष गांगोडे (शिवसेना) जिजा शांताराम चारोस्कर,(राष्ट्रवादी काँग्रेस) राणी रवी भोई (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४ (अनु.जमाती) – सचिन बंडू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)अक्षय वसंत बदादे (भाजप) , सुनीता रमेश लहांगे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ५ (सर्वसाधारण) – नरेश भास्करराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रदीप श्रीकांत देशमुख (शिवसेना)
प्रितम प्रकाशराव देशमुख (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ६ (सर्वसाधारण महिला) – अरुणा रणजित देशमुख (भाजपा), सुनीता अण्णासाहेब बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस)
कमल दत्तू शिंदे(अपक्ष)
प्रभाग क्रमांक ७ (सर्वसाधारण महिला) – राजश्री सतीश देशमुख (शिवसेना), संगीता प्रमोद देशमुख (भाजपा), लता रमेश बोरस्ते ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ८ (सर्वसाधारण महिला)– शैला सुनील उफाडे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), वैशाली विनोद चव्हाण (अपक्ष) ,
प्रभाग क्रमांक ९ (अनु.जमाती महिला) – निकिता प्रितम कांबळे, ( राष्ट्रवादी काँग्रेस)मेघा नितीन धिंदळे मेघा (शिवसेना) , जयश्री एकनाथ हिंडे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १० (अनु.जाती) – जयेश शाम गवारे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ) नितीन मधुकर गांगुर्डे (भाजपा) लता दशरथ निकम (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
प्रभाग क्रमांक ११ (सर्वसाधारण महिला)– विमल गुलाब जाधव (काँगेस), अमृता हंसराज देशमुख (अपक्ष), माधुरी श्रीकांत साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १२ (अनु.जमाती) – आशा भास्कर कराटे (भाजपा), तुषार रामदास चारोस्कर (अपक्ष) ,धनराज सुनील भवर (राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक १३ (सर्वसाधारण महिला)- ज्योती सचिनराव देशमुख (शिवसेना), शुभांगी अमोल मवाळ (मनसे)
प्रभाग क्रमांक १४ (सर्वसाधारण) -अक्षय अशोक चारोस्कर (अपक्ष) दिपक भास्कर जाधव ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष) , प्रशांत भालचंद्र मोगल (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १५ (अनु.जाती महिला)– सुनीता सुनील अस्वले (मनसे), प्रज्ञा तुषार वाघमारे (भाजपा) , नंदिनी अनिल साठे ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष)
प्रभाग क्रमांक १६ (सर्वसाधारण) – श्रीराम सुभाष जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), गणेश शांताराम बोरस्ते (काँग्रेस), चंद्रकांत बाळासाहेब राजे (अपक्ष)
एकूण १७ जागांपैकी १६ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात उभे आहेत.व प्रभाग क्रमांक १७ मधून शिवसेनेचे उमेदवार सुजित मुरकुटे हे बिनविरोध निवडून आले आहे.
पक्ष निहाय उमेदवार
राष्ट्रवादी काँगेस १४ , भाजपा १०, शिवसेना ८ (एक बिनविरोध), इंदिरा काँग्रेस ४, मनसे ४ व अपक्ष १० असे एकूण ४८ उमेदवांरांचे भविष्य बुधवारी कळणार आहे.