दिंडोरी – येथील नगरपंचायतच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत तीन उमेदवारांनी माघार घेतली असून दोन्हीही प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग क्र.११ मधून राधाबाई गोपाळराव देशमुख यांनी तर प्रभाग १६ मधून रोहिणी दिपक जाधव व मनोज काशिनाथ ढिकले यांनी माघार घेतली. अर्ज माघारीनंतर दोन्ही प्रभागात तीन उमेदवार रिंगणात असून त्यात प्रभाग ११ मध्ये माधुरी श्रीकांत साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस)विमल गुलाब जाधव (काँग्रेस) अमृता हंसराज देशमुख (अपक्ष) प्रभाग क्र १६ मध्ये श्रीराम जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) गणेश बोरस्ते(काँग्रेस) चंद्रकांत राजे (अपक्ष) अशा तिरंगी लढती रंगणार आहे.दरम्यान शिवसेनेची काँग्रेस सोबत आघाडी असून दोन्ही जागा काँग्रेसला सोडल्या आहेत तर भाजप ने पक्षातर्फे उमेदवार न देता अपक्ष उमेदवार उभे करत वेगळी व्यूहरचना आखली आहे. या दोन्ही प्रभागात चुरशीच्या तिरंगी लढती रंगणार आहे.