दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत निवडणूक येत्या २१ डिसेंबर ला होत असून एकूण १७ जागांपैकी १४ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात असून एकूण ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे. दोन प्रभाग इतर मागासवर्ग साठी राखीव असल्याने त्या जागेवर निवडणुकीला स्थगिती आहे. प्रभाग क्रमांक १७ मधून शिवसेनेचे सुजित त्र्यंबक मुरकुटे हे बिनविरोध निवडून आले आहे.एकूण ११ उमेदवारांपैकी माघार घेणारे शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक व अपक्ष सहा उमेदवार आहेत.
देशात, राज्यात ,जिल्यात, तालुक्यात विविध राजकीय पक्षांची युती, महाविकास आघाडी, होत असली तरी दिंडोरी शहराचे राजकारण आतापर्यंत पक्षविरहित असल्याने एकही पक्षाने पूर्ण जागेंवर आपले उमेदवार दिले नाही.अंतर्गत एकमेकांना मदत करण्यासाठी पक्ष उमेदवारांची माघार घेतली जाते हा आतापर्यंतचा इतिहास आहे.आणि यावेळीही त्याच पद्धतीने ही निवडणूक होत आहे.
दिंडोरी नगरपंचायत प्रभागनिहाय उमेदवार
प्रभाग क्रमांक 1 (सर्वसाधारण महिला) बोरस्ते रत्नाबाई सुभाष (शिवसेना) मवाळ निर्मला कैलास ( राष्ट्रवादी काँग्रेस),गायकवाड रोहिणी भगवान (भाजपा), शिंदे मेघा केशवराव (अपक्ष) वपारखे मिराबाई नारायण (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 2(सर्वसाधारण)
जाधव अविनाश बाबुराव (राष्ट्रवादी काँग्रेस),राजे रचना विक्रमसिंह (भाजप),शिंदे निलेश भाऊसाहेब (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 3 (अनु.जमाती महिला)गांगोडे कल्पना संतोष (शिवसेना) चारोस्कर जिजा शांताराम ,(राष्ट्रवादी काँग्रेस),भोई राणी रवी (भाजपा)
प्रभाग क्रमांक 4 (अनु.जमाती)
पवार सचिन बंडू (राष्ट्रवादी काँग्रेस)बदादे अक्षय वसंत (भाजप) ,लहांगे सुनीता रमेश (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 5 (सर्वसाधारण)
देशमुख नरेश भास्करराव (राष्ट्रवादी काँग्रेस),देशमुख प्रितम प्रकाशराव (अपक्ष) देशमुख प्रदीप श्रीकांत (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 6 (सर्वसाधारण महिला) देशमुख अरुणा रणजित (भाजपा), बोरस्ते सुनीता अण्णासाहेब (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिंदे कमल दत्तू (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 7 (सर्वसाधारण महिला) देशमुख राजश्री सतीश (शिवसेना),देशमुख संगीता प्रमोद(भाजपा),बोरस्ते लता रमेश ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 8 (सर्वसाधारण महिला) उफाडे शैला सुनील (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), चव्हाण वैशाली विनोद (अपक्ष) ,
प्रभाग क्रमांक 9 (अनु.जमाती महिला) कांबळे निकिता प्रितम, ( राष्ट्रवादी काँग्रेस)धिंदळे मेघा नितीन (शिवसेना) ,हिंडे जयश्री एकनाथ (भाजपा)
प्रभाग क्रमांक 10 (अनु.जाती)
गवारे जयेश शाम (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ) गांगुर्डे नितीन मधुकर (भाजपा)निकम लता दशरथ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
प्रभाग क्रमांक 11 (इतर मागास वर्ग)- निवडणूक स्थगिती
प्रभाग क्रमांक 12 (अनु.जमाती)
कराटे आशा भास्कर (भाजपा)
चारोस्कर तुषार रामदास (अपक्ष)
पवार धनराज सुनील(अपक्ष)
प्रभाग क्रमांक 13 (सर्वसाधारण महिला) , देशमुख ज्योती सचिनराव (शिवसेना), मवाळ शुभांगी अमोल (मनसे)
प्रभाग क्रमांक 14 (सर्वसाधारण)
चारोस्कर अक्षय अशोक (अपक्ष) जाधव दिपक भास्कर ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष) ,मोगल प्रशांत भालचंद्र (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 15 (अनु.जाती महिला) अस्वले सुनीता सुनील(मनसे), वाघमारे प्रज्ञा तुषार (भाजपा) , साठे नंदिनी अनिल ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष)
प्रभाग क्रमांक 16 (इतर मागास वर्ग) -निवडणूक स्थगिती
प्रभाग क्रमांक 17( सर्वसाधारण)
मुरकुटे सुजित त्र्यंबक (शिवसेना)
बिनविरोध निवड
उमेदवारी मागे घेणारे उमेदवार (प्रभाग निहाय)
प्रभाग क्रमांक 2 मधून जाधव रचना अविनाश(अपक्ष) देशमुख सुहास अनिलराव (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 5 मधून खान फारूक मोहम्मद (भाजपा)
प्रभाग क्रमांक 7 मधून गायकवाड प्रिया निलेश (अपक्ष) ,देशमुख श्रद्धा सुहास (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १० मधून साठे बाळू बाबुराव (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 12 मधून गांगोडे राकेश गुलाब (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 13 मधून देशमुख पूजा अविनाश ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 14 मधून वाघमारे तुषार मधुकर ( भाजपा) सोनवणे प्रविण सोमनाथ (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 17 मधून शिंदे दिनेश केशवराव (अपक्ष) आदी 11 उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण 17 जागांपैकी 14 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उभे आहेत.प्रभाग क्रमांक 11 व 16 इतर मागासवर्ग साठी राखीव असल्याने या जागेवरील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे.व प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे उमेदवार सुजित मुरकुटे हे बिनविरोध निवडून आले आहे.
एकूण 11 उमेदवारांपैकी माघार घेणारे शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक व अपक्ष सहा उमेदवार आहेत.शिवसेना भाजपचे शेवटच्या क्षणापर्यंत युतीचे प्रयत्न सुरू होते.दिंडोरी शहरात कोणी कोणासाठी माघार घेतली आहे.आणि कोणाची कोणाबरोबर पक्षविरहित गट्टी जमली आहे हे निवडणुकीत दिसणार आहे.
१४ डिसेंबरला चिन्हांचे वाटप
मंगळवार 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक चिन्हांचे वाटप आदिवासी सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.