दिंडोरी : शासनाने मोबाईलमध्ये ई- पीक नोंदणी अॅप दिशादर्शक असून शेतकर्यांसाठी हे अॅप उपयोगी ठरणार आहे. यात येणार्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील. ई – पिक पाहणी प्रकल्पात शेतकर्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे’, असे प्रतिपादन राज्याचे अव्वर सचिव नितीन करीर यांनी केले. दिंडोरी येथे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जाधव यांच्या शेतात राज्याचे महसूल अप्पर सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट दिली. त्याप्रसंगी नितीन करीर यांनी सुचना केल्या. शासनाच्या अधिकारी, कर्मचार्यांशी संवाद साधला. यावेळी शासनाच्या ई – पिक पाहणी प्रकल्पात प्रतिक जाधव यांनी इ- पिक पाहणीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्यांनी शेती क्षेत्रात जाऊन मोबाईलमध्ये द्राक्षशेतीचा फोटो काढला. त्याची माहिती स्किनवर टाकली. सातबारा उतार्यावरील नाव, गट क्रमांक, खाते क्रमांक यांची सर्व माहिती कशी भरावी, याचे प्रात्यक्षिक अव्वर सचिव नितीन करीर यांना करुन दाखविले. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जाधव यांनी शेतीची माहिती देवून इ-पीक प्रकल्पाबाबत सुचना सांगितल्या. इ-पीक पाहणी नोंदणी प्रकल्प शेतकर्यांसाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. त्यात येणार्या अडचणी जरी असल्या तरी नवीन पिढीत मोबाईलचा वापर वाढल्याने इ-पीक नोंदणी महसूल खात्यासाठी उपयुक्त ठरेल, असे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले. यावेळी कृषी सहाय्यक रुपाली लोखंडे, तलाठी अश्विनी बागूल, रोहिणी टाळकुटे यांनी इ-पीक पाहणी प्रकल्पाची इंटरनेटवर नोंद कशी होते, याची प्रात्यक्षिक दाखविले. नितीन करीर, राधाकृष्ण गमे यांनी नोंद करताना येणार्या अडचणींची माहिती विचारली. प्रांत संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. यावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब जाधव यांच्या शेतीबद्दल अव्वर सचिव नितीन करीर यांनी माहिती घेतली. चर्चेत प्रतिक जाधव, डॉ. राहुल जाधव, भगवान जाधव, जयंवंत जाधव, किरण जाधव, पप्पु जाधव, संजय जाधव, हेमंत जाधव, आकाश जाधव, सागर बोरस्ते, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी सहभाग घेवून पिकांबाबत माहिती दिली. त्यानंतर अव्वर सचिवांनी शेतकर्यांचा सहभाग वाढवण्याच्या सुचना अधिकार्यांना दिल्या. स्वागत प्रांत संदीप आहेर व तहसीलदार पंकज पवार यांनी केले. आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.