दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य परनार्ड रिकार्ड प्राय. लि. कंपनीकडून डेल कंपनीचे डेस्कटॉप संगणक तालुक्यातील अकरा शाळांना संच वाटप करण्यात आले.
कोवीड पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी तसेच कार्यालयीन कामकाजात हे डेस्कटॉप संगणक संच निश्चितच उपयुक्त ठरतील. संगणक मिळणेकामी संतोष कथार व गुणवंत शिक्षक विलास जमदाडे सर यांच्या माध्यमातून वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
११ शाळांना देणगी
कोवीड पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त सात लाख रूपयांपेक्षा अधिक किंमतीचे डेस्कटॉप संगणक तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक ११ शाळांना देणगी दिल्याबद्दल कंपनीचे व्यवस्थापन यांचे आभार
– बी. डी. कनोज, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, दिंडोरी]