सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव येथे पोळ्याच्या दिवशी सजवून बैलांना गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी नेल्यानंतर तेथे सलामी देतांना बैल बिथरल्याने त्यांने ग्रामस्थाला शिंगाने उडविले. पोळ्याला मंदिरासमोर बैलाला सलामी देण्याची परंपरा आहे. पण, ही सलामीच देत असतांना येथे गर्दी झाली व बैल बिथरला. त्यानंतर सर्वच गावक-यांची धावपळ झाली. या बैलाने सुरुवातीला शिंगावर घेत काही गावक-यांना खाली पाडले. त्यानंतर तो सैरवर झाला व त्याने धूम ठोकली.