गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इकडे लक्ष द्या! डिजिटल पेमेंटमध्ये होणार हे मोठे बदल

by India Darpan
फेब्रुवारी 9, 2022 | 5:41 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना महामारीच्या काळात पेमेंट्स उद्योगात मोठे बदल दिसून आले. सध्या, जास्तीतजास्त ग्राहकांना डिजिटल पेमेंटचा पर्यायच सोयीस्कर वाटताना दिसतो आहे. २०२२ हे वर्षदेखील डिजिटल पेमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण क्रिप्टोकरन्सीमध्येदेखील या संपूर्ण वर्षात वाढ दिसून येणार आहे.

एपीएमईए पेमेंट्सचे प्रमुख मुरलीधरन श्रीनिवासन यांच्या मते, या वेगाने बदलत असलेल्या उद्योगाच्या वरच्यास्थानी राहण्यासाठी किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अशा काळात डिजिटल पेमेंट उद्योगात २०२२ मध्ये अनेक नवीन बदल अपेक्षित आहेत. बिटकॉइन ही मूळ आणि सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. २००८मध्ये ही करन्सी रिलीज झाली होती. परंतु गेल्या काही वर्षांत बिटकॉइनने डिजिटल मालमत्तेच्या बाबतीत वेगाने वाढ नोंदवली आहे. बाय नाऊ, पे लेटर (बीएनपीएल) म्हणजेच आता खरेदी करा, नंतर पैसे द्या या पद्धतीने ऑनलाइन खरेदीला नाविन्यपूर्ण आणि सुलभ केले आहे. यामुळे साहजिकच खरेदी – विक्रीमध्ये वाढ झाली आहे. या प्रकारच्या सेवेत येत्या काही दिवसात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२०२२मध्ये, बीएनपीएल व्यापाऱ्यांचा अनुभव विशेष बनवण्यासाठी काम करेल. याचा अर्थ वापरकर्ते कोणत्या दुकानातून किंवा ऑनलाइन खरेदी करायची हे ठरवू शकतील. बीएनपीएलमुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे वापरकर्त्याला वेगवेगळ्या व्यापार्‍यांमधील किंमतीतील फरक पाहता येतो. यामुळे खरेदीदाराला खरेदी करताना विश्वासही वाटतो. येत्या काही दिवसांत, आम्ही पेमेंट पर्याय म्हणून स्टॉक आणि क्रिप्टो समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामुळे ग्राहकांना स्टॉक आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये अधिक गुंतवणूक करता येईल, असेही पेमेंट्सचे प्रमुख मुरलीधरन श्रीनिवासन यांनी सांगितले आहे. बदलत्या पेमेंट योजनांमुळे बाजारात पैसा खेळता राहील, त्यामुळे साहजिकच भविष्य लाभदायी असणार आहे. हे वर्ष ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिकाधिक सोपा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. एकूणच डिजिटल पेमेंट प्रकारामुळे बाजारात आर्थिक वृद्धी होणार असल्याचे चित्र आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बापरे! माकडांनी केलेल्या हल्ल्यात चिमुकली ठार; नागरिकांमध्ये प्रचंड भीती

Next Post

कर्करोगावर नियंत्रण शक्य (विशेष लेख)

India Darpan

Next Post
cancer

कर्करोगावर नियंत्रण शक्य (विशेष लेख)

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011