– आपला व्यवसाय डिजिटल करा तोही मोफत –प्रदीप पेशकार.
– पुणे येथील Ablifree Business Network (ABN) चे सहकार्य
नाशिक – सर्व उद्योजकांना आपला व्यवसाय मोफत डिजिटल करता येणार असल्याची माहिती उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली. ही योजना २० मे पासून सुरु होईल, सदर योजनेचा कालावधी मर्यादित असल्याने ,लवकरात लवकर आणि अधिकाधिक उद्योजकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन उद्योग मित्र संस्थेकडून करण्यात आले आहे.
या डिजिटल कॅम्प बाबत पेशकारर म्हणाले की, सध्या कोविड-१९ मुळे उद्योजक आर्थिक संकटांशी सामना करीत आहेत. ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने व्यवसायाची जाहिरात करणे जास्त प्रभावकारी आणि फायदेशीर ठरत असल्याने त्याकडे उद्योजकांचा कल वाढत असला तरी , अजूनही असंख्य व्यावसायिकांकडे यासाठीची माध्यमे उपलब्ध नाहीत किंवा गुंतवणुकीमुळे प्रलंबित झालेली आहेत.
त्यांची अडचण लक्षात घेऊन सर्वसामान्य उद्योजकांना देखील त्यांच्या उत्पादन/सेवांसाठी जर हा डिजिटल मंच उपलब्ध करून देता आला तर त्यांच्याही व्यवसायाला चालना मिळेल. या उपक्रमात अग्रणी खाजगी बॅंक येस बॅंकेने सुध्दा सहभाग घेतला आहे. बॅंके तर्फे स्टार्ट अप तसेच सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनेतून करण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची माहिती देण्यात येणार आहे.YES MSME या योजनेतून पात्र उद्योगांना अर्थसहाय्य सुध्दा देण्यासाठी उद्योग मित्र संस्था शिफारस करणार आहे.
या विचारातून उद्योग मित्र संस्थेतर्फे ABN यांच्या सहकार्यातून डिजिटल MSME कॅम्प,सुरु करीत आहेत. मी MSME, नॅशनल बोर्डचा सदस्य आहेत. अनेक वर्षांच्या माझ्या औद्योगिक क्षेत्रातील अनुभवातून सदर योजनेसाठी उद्योग मित्रने पुढाकार घेऊन उद्योजकांसाठी हे दालन मोफत उपलब्ध करून दिले आहे. सूक्ष्म, लघु,मध्यम उद्योजक,घरगुती उत्पादन करणारे व्यवसायिक,बचत गट,किरकोळ विक्री करणारे, इत्यादी अनेक उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.
मोफत मिळणाऱ्या सुविधा;
– वेबपेज .: डिजिटल प्रवासाची सुरुवात.
– इ -कॉमर्स ऍक्टिव्हशन: ऑनलाईन प्रोडक्ट विक्री.
– ऑनलाईन मार्केटिंग मार्गदर्शन: व्यवसायाची जाहिरात करणे.
या सुविधांचा फायदा घेण्यासाठी हे करा
आपले नाव.
व्यवसायाचे नाव.
व्यवसायाचा संपूर्ण पत्ता, पिनकोडसह.
व्यवसायाचे स्वरूप( उत्पादन, प्रोडक्टस, सेवा इत्यादी).
व्यवसायाचा कालावधी.
संपर्क क्रमांक.
ई-मेल.
इत्यादी गोष्टींची संगतवार माहिती, उद्योग मित्र संस्थेला खालील माध्यमांद्वारे
पाठवावी.
व्हाट्स अँप : अमित ९३२२४२९८३१, सौरभ ८३७८९७६२७२