शिरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील जामन्यापाडा ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. गुलाब रामदास चौधरी (वय ४४) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. त्याने १४०० रुपयांची लाच मागितली होती. आणि तो रंगेहाथ सापडला. आता याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामन्यापाडा येथील महिलेचा जन्म दि.01/05/1968 रोजी मौजे जामन्यापाडा, ता. शिरपुर येथे झाला. त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती. त्यांची जन्माची नोंद होणे करीता या महिलेने शिरपुर येथील मे ज्युडीशिअल मॅजि वर्ग01 यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होणे करीता फौजदारी किरकोळ अर्ज नं 472/2022 दाखल केला होता.
या अर्जावर सुनावणी होवुन न्यायालयाने या महिलेच्या जन्माची दप्तरी नोंद घेणे बाबत दि.14/10/2022 रोजी आदेश पारित केले आहेत. त्याप्रमाणे या महिलेच्या जन्माची दप्तरी नोंद होणे करीता दि. 16/5/2023रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जामन्यापाडा येथे जावुन मा.न्यायलयाच्या आदेशांची प्रत जोडुन अर्ज ग्रामसेवक गुलाब चौधरी यांच्याकडे जमा करण्यात आला..
जन्माची दप्तरी नोंद घेवुन जन्म दाखला देण्यासाठी 1400/- रूपये लेट फीच्या नावाखाली लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी दुरध्वनी व्दारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे तक्रार आली. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाचे पथकाने सापळा रचला. आणि या सापळ्यात लाचखोर ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी अडकला. ग्रामपंचायत कार्यालयात तो रंगेहाथ सापडला.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी*
*श्री. अभिषेक पाटील* पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे
सापळा अधिकारी *श्री प्रकाश झोडगे* पोलीस निरीक्षक ला.प्र. वि.धुळे
*सहा.सापळा अधिकारी* श्री.मंजितसिंग चव्हाण,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.धुळे
*सापळा पथक*:-राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल ,मकरंद पाटील,प्रविण पाटील,मपोशी गायत्री पाटील,रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर.
**मार्गदर्शक
*मा.श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर सो.* 9371957391पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र.
*मा.श्री नरेंद्र पवार सो* 7977847637 वाचक,पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि नाशिक परीक्षेत्र.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे.* संतोषी माता चौक धुळे.
*@ दुरध्वनी क्रं. 02562-234020*
*@ मोबा.क्रं. 8888881449, 9922447946,9657009727*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
Dhule Shirpur Gramsevak ACB Raid Bribe Corruption