नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या स्पाइसजेट ला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा दणका दिला आहे. एअरलाइनच्या ५० % उड्डाण सेवांवर डीजीसीएने बंदी घातली आहे. ही बंदी आठ आठवड्यांसाठी आहे. डीजीसीएच्या निवेदनानुसार, स्पाईसजेटने दिलेल्या कारणे दाखवा नोटिसांना स्वतंत्र स्पॉट चेक, तपासणी आणि उत्तरे दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली की, डीजीसीएने ९ जुलै ते १३ जुलै दरम्यान ५३ वेळा ४८ स्पाइसजेट विमानांची तपासणी केली, परंतु कोणतेही मोठे सुरक्षा उल्लंघन आढळले नाही. १९ जूनपासून १८ दिवसांच्या कालावधीत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाची किमान आठ प्रकरणे समोर आली. त्यानंतर डीजीसीएने ६ जुलै रोजी एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. व्ही के सिंह म्हणाले की, नोटीस जारी केल्यानंतर तीन दिवसांनी स्पाइसजेटच्या विमानांची चौकशी सुरू केली. १३ जुलै रोजी घटनास्थळी तपास पूर्ण झाला. त्यानंतर आता डीजीसीएने स्पाईसजेटला नोटिस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, पुढील ८ आठवड्यांसाठी कंपनीच्या ५० टक्के उड्डाणांवर बंदी असणार आहे.
https://twitter.com/flyspicejet/status/1552301605844054016?s=20&t=h4In5zQO08wITAc7KZpgBQ
https://twitter.com/CNBCTV18News/status/1552273545018875906?s=20&t=h4In5zQO08wITAc7KZpgBQ
DGCA Action on Spicejet Curtail 50 Percent flight MOCA