नागपूर – विधान परिषद निवडणुकीत अकोला आणि नागपूर या दोन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. अकोला येथे वसंत खंडेलवाल तर नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार झाले आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करुन भाजपने या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. या विजयाबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक आहे. यातून त्यांनी योग्य तो धडा घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बघा, फडणवीस यांच्या संपूर्ण प्रतिक्रीयेचा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1470652038686019584?s=20