मुंबई – राज्याच्या राजकारणात आणि देवेंद्र फडणवीस विरुद्ध नवाब मलिक असा नवा अंक पहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करीत संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढले आहे. अंडरवर्ल्ड पासून ते खासगी जीवनापर्यंत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन फडणवीस हे गुंड आणि अंडरवर्ल्डशी कसे संबंधित आहेत, नोटाबंदीच्या काळात फडणवीस यांची भूमिका कशी राहिले याबाबत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाला उत्तर देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे.
साहित्याचे नोबेल विजेते प्रख्यात लेखक जॉर्ज बर्नॉड शॉ यांचा एक सुविचार फडणवीस यांनी पोस्ट केला आहे. त्यात शॉ म्हणतात की, “काही काळापूर्वी मी एक शिकलो की, डुकरासोबत कधीही कुस्ती खेळू नये. तसे केले तर तुम्हाला घाण लागते. आणि त्याचबरोबर डुकारालाही ते आडायला लागते.” या पोस्टमध्ये फडणवीस यांनी मलिक यांचा कुठलाही उल्लेख केलेला नसले तरी त्यांचा रोख हा मलिक यांच्याकडेच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, फडणवीस काय खुलासा करणार, फडणवीस यांच्या या टीकेला मलिक हे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1458313535604211715