इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शाहरुख आणि गौरी खान हे बॉलीवूडमधील एक लोकप्रिय कपल. एकमेकांना सांभाळून घेत हे दोघे आपलं स्टारडम एन्जॉय करत असतात. शाहरुख खानची बायको याशिवायही गौरीची स्वतंत्र ओळख आहे. उत्कृष्ट इंटिरिअर डिझायनरपैकी ती एक आहे. गौरी खानचे नुकतेच ‘माय लाईफ इन डिझाईन’ या कॉफी टेबल बुक हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकातून गौरीने खान कुटुंबियांच्या अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. या पुस्तकाचे काही फोटोही समोर आले होते. तेव्हापासूनच या पुस्तकाची प्रचंड उत्सुकता होती.
शाहरुखची तारीख लगेच मिळाली
या पुस्तक प्रकाशनाला अभिनेता शाहरुख खान देखील उपस्थित होता. आपल्या व्यस्त दिनक्रमातून शाहरुखने यासाठी वेळ कसा काढला, असे गौरीला विचारले असता, ती म्हणाली की, कार्यक्रमासाठी शाहरुखची वेळ घेणे अत्यंत सोपे होते. मात्र, अर्जुन फार व्यस्त असल्याने त्याचीच वेळ मिळणे अडचणीचे झाल्याचे गौरी म्हणते. तो सध्या कामात फार बिझी आहे. माझ्या या पुस्तकातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कुटुंबाचा फोटो आहे.
गौरी खानने यापूर्वी ‘ड्रीम हाऊस विथ गौरी खान’ हा शो होस्ट केला होता. यात तिने अनेक कलाकारांची घरं पुन्हा डिझाइन केली होती. तसेच नेटफ्लिक्सच्या ‘फेब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्हज’मध्ये तिने तिच्या डिझायनर स्टोअरची झलकही चाहत्यांना दाखवली होती.
https://twitter.com/gaurikhan/status/1648202573369966593?s=20
Designer Gauri Khan on Son Aryan Khan









