नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करीत भारतीय कुस्तीगिरांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. याची दखल घेत सरकारने निरीक्षण समिती नेमली. मात्र, या समितीने कुस्तीगीरांच्या तक्रारी ऐकण्याऐवजी भलताच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.
कुस्तीगीरांच्या आंदोलनामुळे कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतातील कुस्तीगिरांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. भारतीय कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष करीत गुन्हा दाखल केला नाही. परिणामी कुस्तीगिरांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
कुस्ती या खेळात मोलाची कामगिरी केलेल्या विनेश फोगाट, साक्षी मलिक आदी कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीमधील जंतरमंत मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले. दुसरीकडे या प्रकरणी दिल्ली पोलिसांसमोर ब्रिजभूषण सिंह याने जबाबही नोंदवला असून त्याच्यावर झालेले आरोप त्याने फेटाळले आहेत. परंतु, ब्रिजभूषण सिंहला अटक होत नाही तोवर जंतरमंतर सोडणार नसल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष निरीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. बॉक्सर आणि राज्यसभेच्या माजी खासदार मेरी कॉम, एसएआयचे संचालक राधिका श्रीमान, क्रीडा मंत्रालयाचे माजी सीईओ राजेश राजागोपालन, माजी शटरल तृप्ती मुरुगुंडे, ऑलिम्पिक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि जागतिक चॅम्पिअनशिप पदक विजेती बबिता फोगाट या समितीचे सदस्य आहेत. या समितीच्या पहिल्या सुनावणीवेळ प्रत्येक पीडितेला स्वतंत्र हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे या पीडिता घाबरल्या होत्या. परंतु, त्यानंतरच्या सुनावणीवेळी आम्ही गटाने हजर राहिलो, असेही कुस्तीपटूने सांगितले.. आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या असून १२ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये काही पैलवानांचाही समावेश आहे.
https://twitter.com/wrestlerprotest/status/1658352983342731265?s=20
समितीसमोर पीडितांची बाजू ऐकण्यात आली आहे. परंतु, पीडितांची बाजू ऐकताना समितीने तक्रारकर्त्यांनाच सल्ला देत त्यांनाच चार शब्द ऐकवल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे काही कुस्तीपटूंनी एका मुलाखतीत या संदर्भात खुलासा केला आहे. ब्रिजभूषण सिंह वडिलांसारखे आहेत. त्यांनी कोणत्याही वाईट हेतुने स्पर्श केला नसेल, त्यांच्या वागण्यातून कदाचित गैरसमज निर्माण झाला असेल, ते निष्पाप आहेत, असेही समितीने पीडितांना सांगितले. तसेच महिला कुस्तीपटूने एका मुलाखतीत सांगितले, यापुढे आम्ही फक्त महिला सदस्यांसमोर आम्ही म्हणणे मांडणार आहोत, असेही त्यांनी सांगितल्यानंतरही त्यांची विनंती नाकारण्यात आली होती.
गेल्या आठवड्यात ब्रिजभूषण सिंह याचाही पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. परंतु हे जबाब अत्यंत घाईने घेण्यात आले, अत्याचार झाला तेव्हाचे रेकॉर्डिंग हा पुरावा म्हणून ग्राह्य देणाऱ्या देण्यात येणार आहे. परंतु त्याची रेकॉर्डिंग ठेवायला सांगणे म्हणजे हा एक प्रकारे अन्यायाचा आहे, असे रेकॉर्ड असू शकत नाही, असेही या पीडित खेळाडूंचे म्हणणे आहे.
पीडिता त्यांची बाजू मांडत असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद करण्यात आले होते. परंतु, या प्रकरणी समितीच्या राधिका श्रीमान यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांच्या जबाबाची नोंद व्हिडीओद्वारे केली आहे. त्यामुळे आता कोणीही स्टेटमेंट बदलू शकत नाही. ब्रिजभुषण सिंह याच्याविरोधातील लैंगिक छळाच्या अनेक घटनांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
https://twitter.com/wrestlerprotest/status/1658315425460137984?s=20
Delhi Wrestler Protest Panel Enquiry WFI