नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्लीत चक्क महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच विनयभंग झाला आहे. तसेच, त्यांच्याशी छेडछाड करण्यात आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना एका व्यक्तीने कारमधून ओढून नेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्वतः याबाबत माहिती दिली आणि सांगितले की बुधवारी रात्री उशिरा एका कार चालकाने त्यांना 10-15 मीटरपर्यंत ओढले. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनीही हे प्रकरण अतिशय गांभिर्याने घेतले आहे.
स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे की, देवाने तिचे प्राण वाचवले नाहीतर ती अंजलीसारखी माझी अवस्था झाली असती. मालीवाल यांचा विनयभंग करून तिला कारमधून ओढल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 47 वर्षीय हरिश चंद्र असे आरोपीचे नाव आहे. यासोबतच आरोपीची कारही जप्त करण्यात आली आहे.
स्वाती यांनी ट्विट करून या प्रकरणाची माहितीही दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘काल रात्री मी दिल्लीतील महिला सुरक्षेची स्थिती पाहत होते. एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला. आणि जेव्हा मी त्याला पकडले तेव्हा त्याने माझा हात कारच्या आरशात बंद केला. आणि मला ओढले. देवानेच माझे प्राण वाचवले, दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर काय अवस्था होईल याची कल्पना करा.
https://twitter.com/SwatiJaiHind/status/1616000395683459073?s=20&t=h3i-D3PaO_CpwojrbTwQAg
कार चालकाने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले असता त्यांनी प्रतिकार केल्याची घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्या गाडीच्या चालकालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. स्वाती मालीवाल यांच्यासोबतची घटना एम्सच्या गेट क्रमांक दोनसमोर घडली. त्यावेळी त्या रिअॅलिटी चेक करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. आणि त्यांची टीमही त्यांच्यापासून काही अंतरावर होती. ही घटना गुरुवारी पहाटे ३.११ च्या सुमारास घडली.
स्वाती मालीवाल काय म्हणाल्या
स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बलिनो कारमधील एका व्यक्तीने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. मी नकार दिल्याने आरोपी निघून गेला, मात्र पुन्हा यू-टर्न घेऊन सर्व्हिस लेनमधून परत आला. कार चालकाने पुन्हा बसण्यास सांगितले, मी पुन्हा नकार दिला. आरोपीला धरण्यासाठी मी खिडकीतून हात घातला आणि ड्रायव्हरच्या सीटकडे गेली. यादरम्यान आरोपींने आरसा बंद केल्याने माझा हात अडकला. आरोपीने मला १५ मीटरपर्यंत ओढले. या घटनेतर पोलिसांनी स्वाती मालीवाल यांची लेखी तक्रार घेऊन आरोपी हरीश चंद्र (४७) याला अटक केली. त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपी संगम विहार येथील रहिवासी आहे.
https://twitter.com/ANI/status/1616023781277061121?s=20&t=h3i-D3PaO_CpwojrbTwQAg
Delhi Women Commission Chairman Swati Maliwal Molestation