रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वसईतील श्रद्धाच्या निघृण हत्येने संपूर्ण देश हादरला; मृतदेहाचे ३५ तुकडे… टीव्ही शो पाहून गुन्हा… पोलिसही झाले थक्क…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 14, 2022 | 9:21 pm
in राष्ट्रीय
0
Shraddha Murder

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांडानंतर आता एकापेक्षा एक खुलासे होत आहेत. हत्येचा आरोपी आफताब अमीन पूनावालच्या क्रूरतेने आणि निर्दयतेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने गुगलवर काही बाबी सर्च केल्या होत्या. त्यात रक्त कसे स्वच्छ करावे आणि मानवी शरीरशास्त्र याबाबत त्याने गुगल सर्च केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांच्या चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की, १८ मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला होता. त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने गुगलवर मानवी शरीरशास्त्राबद्दल वाचले होते, जेणेकरून त्याला श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यात मदत होईल. पोलिसांनी सांगितले की त्यांनी आफताबचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले असून त्याची कसून चौकशी केली जाईल.

या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चौकशी केल्यानंतर पोलीस आफताबची ही कबुली खरी मानतील. गुगल सर्च केल्यानंतर त्याने श्राद्धाच्या रक्ताचे डाग जमिनीवरून साफ केले, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी त्याने केमिकलचा वापर केला आणि घाणेरडे कपडे फेकून दिले. त्यानंतर त्याने मृतदेह बाथरूममध्ये ठेवला आणि जवळच्या दुकानातून फ्रीज विकत आणला. नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले.

त्याच खोलीत तो झोपायचा
दिल्ली पोलिसांना श्रद्धाच्या वडिलांकडून तक्रार मिळाल्यानंतर १० नोव्हेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत होते. पोलिसांनी सांगितले की, आफताब रोज त्याच खोलीत झोपायचा ज्या खोलीत त्याने श्रद्धाचे अनेक तुकडे केले होते. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तो अनेकदा तिचा चेहरा पाहायचा. फ्रीजमधून सर्व अवयव फेकून दिल्यानंतर आफताबने फ्रीजही साफ केला होता.

अनेक मुलींशी संबंध
सूत्रांच्या हवाल्याने असेही सांगितले जात आहे की, श्रद्धापूर्वी आफताबचे अनेक मुलींसोबत संबंध होते. हा गुन्हा करण्यापूर्वी त्याने अनेक गुन्हेगारी चित्रपट आणि वेब सिरीज पाहिल्या होत्या. त्यात डेक्सटर या अमेरिकन क्राईम ड्रामा सिरीजचाही समावेश आहे. लग्नाच्या कारणावरून त्यांच्यात अनेकदा भांडण झाल्याची कबुली आफताबने दिली आहे. या प्रकरणी सध्या आफताबविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मेहरौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रद्धाचे ३५ तुकडे
दिल्ली पोलिसांनी सहा महिन्यांच्या एका अंध खून प्रकरणाचा खुलासा केला तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. पोलिसांनी तिच्या हत्येप्रकरणी २८ वर्षीय श्रद्धाच्या लिव्ह-इन पार्टनरला पकडले. हत्येनंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. हे तुकडे त्याने दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात नेऊन फेकले. आफताब हा मुंबईचा रहिवासी आहे. श्रद्धाच्या वडिलांनी तक्रार केली ही त्यांची मुलगी बेपत्ता आहे. त्यानंतर आफताबला दिल्लीतून पकडण्यात आले. न्यायालयाने आरोपी आफताबला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशी झाली ओळख
आफताब आणि श्रद्धा यांची ओळख पहिल्यांदा एका डेटिंग साइटवर झाली होती. यानंतर दोघेही मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये भेटले. दोघेही जवळपास ३ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि नंतर ते दिल्लीला शिफ्ट झाले. येथे आल्यानंतर श्रद्धाने आफताबवर लग्नासाठी दबाव टाकला. दोघे छतरपूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. लग्नाच्या दबावामुळे आफताबने श्रद्धाची निर्घृण हत्या केली.

Delhi Shraddha Murder Case Police Investigation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात? दाढी का ठेवतात? शिक्षकांचा मार खाल्ला होता का? चिमुरड्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – १५ नोव्हेंबर २०२२

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - मंगळवार - १५ नोव्हेंबर २०२२

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011