नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. मात्र, यावेळी महाराष्ट्र सदनामध्ये दोन महापुरुषांचा अवमान करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
आमदार पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का? असा खडा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1662795653137973251?s=20
Delhi Savarkar Jayanti Celebration Controversy