गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या डॉ. शैली ओबेरॉय; कोण आहेत त्या?

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 22, 2023 | 6:47 pm
in राष्ट्रीय
0
FpkdJSAaUAQvm2A

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीत २०२२ मध्ये तिन्ही महापालिका एकत्र करण्यात आल्या. आता संपूर्ण दिल्लीची एकच महापालिका आहे. याच महापालिकेच्या महापौरपदी आम आदमी पार्टीच्या नगरसेविका डॉ. शैली ओबेरॉय यांनी विजय मिळविला आहे. मनपा निवडणुकीनंतर तब्बल दीड महिन्यांनी महापौरपद निवडणूक झाली. त्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. आता जाणून घेऊया नव्या महापौर ओबेरॉय यांच्याविषयी…

भाजपच्या रेखा गुप्ता यांचा पराभव करत ओबेरॉय यांनी हा विजय मिळवला. या निवडणुकीत आपच्या शैली यांना १५० तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना ११६ मते मिळाली. काँग्रेसच्या ९ नगरसेवकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. शैली ओबेरॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय दिल्यामुळे आजची महापौरपदाची निवडणूक शांततेत पार पडू शकली.

‘आप’च्या तिकिटावर शैली ओबेरॉय यांनी दिल्लीतील पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक ८६ मधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि यश संपादन केले. ३९ वर्षीय शैली ओबेरॉय या व्यवसायाने प्राध्यापक आहेत. त्यांनी पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि पहिल्या टर्ममध्येच त्या महापौर झाल्या. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार शेली ओबेरॉय यांनी अवघ्या २६९ मतांनी निवडणूक जिंकली. पटेल नगर विधानसभेच्या प्रभाग क्रमांक ८६ मधून त्यांनी भाजपच्या दीपाली कपूर यांचा पराभव केला.

विशेष म्हणजे, शैली भारतीय वाणिज्य संघटनेच्या आजीवन सदस्य देखील आहेत. त्यांनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (SOMS), इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) येथून तत्वज्ञानात पीएचडी केली आहे. शैली या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट पेपर पुरस्काराची प्राप्तकर्ता आहेत. त्यांनी आयसीए परिषदेत सुवर्णपदक देखील जिंकले आहे. शैली ओबेरॉय यांचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे कारण त्यांनी १५ वर्षे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला सत्तेतून बाहेर काढले आहे.

विजयानंतर शैली ओबेरॉय म्हणाल्या की, मी हे सभागृह संवैधानिक पद्धतीने चालवणार असल्याची ग्वाही देते. सभागृहाची प्रतिष्ठा राखून सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य राहील, अशी आशा आहे.

https://twitter.com/OberoiShelly/status/1628374246731784192?s=20

Delhi MCD Mayor AAP Dr Shelly Oberoi Who is She

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना आणि निवडणूक आयोगावर शरद पवार प्रथमच बोलले.. म्हणाले…

Next Post

एका क्लिकवर मिळणार सर्व महसुली सेवा; लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
FpkZhaJagAA535g e1677072400243

एका क्लिकवर मिळणार सर्व महसुली सेवा; लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011