नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचा अर्थसंकल्प आज सादर होऊ न शकल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी दिल्लीचा अर्थसंकल्प मंजूर करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या अर्थसंकल्पात अशा अनेक तरतुदी होत्या, ज्यावर गृह मंत्रालयाने उत्तर मागितले होते. यानंतर दिल्लीचा अर्थसंकल्प पास होऊ न दिल्याचा आरोप आप सरकारने केंद्रावर केला आहे.
https://twitter.com/AamAadmiParty/status/1638060524117131270?s=20
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज, मंगळवारी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या पत्रात केजरीवाल यांनी लिहिले आहे की, ‘देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही राज्याचा अर्थसंकल्प रोखण्यात आला आहे. आमच्यावर दिल्लीवासी का नाराज आहेत? कृपया दिल्लीचे बजेट थांबवू नका. दिल्लीची जनता तुम्हाला हात जोडून प्रार्थना करते आहे, आमचे बजेट पास करा, अशी कळकळीची विनंती केजरीवाल यांनी पत्रात केली आहे.
https://twitter.com/AamAadmiParty/status/1638067215256756224?s=20
दिल्लीच्या अर्थसंकल्पाला स्थगिती देण्याबाबत दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अर्थसंकल्प अत्यंत पवित्र असून लोकशाहीचा मोठा सण असल्याचे म्हटले आहे. मला आठवत नाही की कोणत्याही राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापासून देश किंवा संपूर्ण जगाला रोखले पाहिजे.
पुढे ते म्हणाले की, हे खूप लाजिरवाणे आहे. लोकांनी पाहिले तर त्यांना काय वाटेल की एक पंतप्रधान एका छोट्या राज्याचा अर्थसंकल्प रोखत आहेत. जो इस्पितळात स्ट्रेचर ओढतो, रस्ते झाडतो, शाळेत शिकवतो, त्याला काय वाटेल की बजेट बंद करून आपला पगार बंद केला जात आहे.
केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करत सौरभ म्हणाले की, ते म्हणतात की आम्ही बातम्या लावतो. ९ मार्चलाच आम्ही बजेट तयार करून त्यांना पाठवले होते. 11 दिवसांपूर्वी पाठवले. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी अर्थसंकल्पाशी संबंधित एवढे महत्त्वाचे पत्र तीन दिवस आपल्याकडे का ठेवले, असा सवाल सौरभ यांनी केला. वित्त सचिव आणि मुख्य सचिव कोणासाठी काम करतात? दोन्ही सचिव केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप मंत्री सौरभ यांनी केला. हे दिल्लीविरुद्धचे षड्यंत्र आहे. मला नायब राज्यपालांकडून जाणून घ्यायचे आहे की ते संध्याकाळपर्यंत वित्त आणि मुख्य सचिवांना हटवतील का. ते हटवणार नाही कारण हे सर्व केंद्राच्या इशाऱ्यावर होत आहे.
सौरभ पुढे म्हणाले की, ही कोणती घटनात्मक व्यवस्था आहे, जे बजेट इतके गुप्त आहे, ते बजेट केंद्र सरकारकडे का जाईल, असा सवाल सौरभ यांनी केला. शेवटी कोणताही केंद्रीय बाबू दिल्लीतील निवडून आलेल्या सरकारच्या वर कसा असू शकतो. ही घटनात्मक व्यवस्था असू शकत नाही, हे कसे शक्य आहे. हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. भांडवली खर्च कमी आणि जाहिराती जास्त हे खोटे असल्याच्या आरोपांवर सौरभ म्हणाले की, हे पूर्णपणे खोटे आहे.
Delhi CM Arvind Kejriwal Letter to PM Narendra Modi