नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज सायंकाळी अचानक खराब हवामानामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम झाला. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने दुपारी 4.30 ते 6 या वेळेत 22 फ्लाइट्सना दिल्ली विमानतळावर उतरू दिले नाही. अशा परिस्थितीत ही विमाने लखनौ, जयपूर, अहमदाबाद, चंदीगड आणि डेहराडूनकडे वळवावी लागली. अनेक विमानांना हवेत चक्कर मारावी लागली. अशा परिस्थितीत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीला येणारी ११ फ्लाइट लखनौला, आठ जयपूरला, एक अहमदाबादला, एक चंदिगडला आणि एक डेहराडूनला वळवण्यात आली. याशिवाय दिल्लीहून उड्डाण करणारी विमाने रनवे आणि पार्किंग बे येथेच थांबवण्यात आली.
पायलटला एटीसीकडून मंजुरी मिळेपर्यंत उड्डाण न करण्याची सक्त सूचना देण्यात आली होती. त्यामुळे 100 हून अधिक उड्डाणे उशीर झाली. दुसरीकडे त्यामुळे विमानतळावरील प्रवाशांच्या अडचणी वाढल्या. वळवलेल्या विमानामुळे परतीच्या दिशेने जाणाऱ्या विमानांनाही उशीर झाला.
एअरलाइन्सने प्रवाशांना संदेश पाठवून याची माहिती दिली. ट्विटरवरूनही माहिती शेअर करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे बुधवारीही 9 हून अधिक विमाने दिल्ली विमानतळाऐवजी अन्य ठिकाणी वळवण्यात आली.
Delhi Bad Weather Air Service Affected Flight Diverted