नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण, नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली परिवहन महामंडळाच्या १ हजार लो-फ्लोअर बसेसच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. संबंधित तक्रार सीबीआयकडे पाठवण्याच्या मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या प्रस्तावाला दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे. नायब राज्यपाल कार्यालयाला या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली होती.
या बसची खरेदी झाल्यानंतर आता त्या प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आल्या आहेत. या बसच्या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. अनेक सरकारी निकष डावलून ही खरेदी झाल्याचा आरोप आहे. मात्र, आमचे काम पारदर्शक आणि जनतेसाठी असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. विनाकारण आम्हाला त्रास देण्याचे काम केले जात असल्याचे आपने म्हटले आहे.
अलीकडेच सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह त्यांच्या इतर ठिकाणांची झडती घेतली होती. त्यानंतर भाजप आणि आम आदमी पार्टी हे दोन्ही पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दिल्ली सरकारवर केवळ दारू धोरणच नाही तर शिक्षण क्षेत्रातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप करत आहे. दिल्लीतील निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. भाजपने आपच्या आमदारांना विकत घेण्यासाठी ८०० कोटी रुपये राखून ठेवल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांनी विधानसभेत बहुमत चाचणी घेतली असतानाही केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे त्यांनी म्हटले होते.
https://twitter.com/JournoAshutosh/status/1568838005754073094?s=20&t=1OxEW10twHT5vcpFYGCDUw
Delhi Arvind Kejriwal CBI Enquiry LG Order
AAP VK Saxena Bus Procurement








