India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दिल्लीत नवा ट्विस्ट! सिसोदिया आणि जैन यांचा राजीनामा नायब राज्यपालांनी नाकारला

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांचा राजीनामा फेटाळला आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांचाही राजीनामा त्यांनी स्वीकारलेला नाही. राजीनामे फेटाळण्यासोबतच नायब राज्यपालांनी दोघांकडून त्यांच्या खात्यांची जबाबदारी काढून घेतली आहे. नायब राज्यपालांच्या कार्यालयातून राजीनामा नाकारण्याची कारणेही देण्यात आली आहेत.

सिसोदिया यांनी राजीनाम्याची तारीख लिहिलेली नसल्याचे कारण नायब राज्यपाल कार्यालयाने दिले आहे. मनीष सिसोदिया यांचा राजीनामा तारखेशिवायच आहे. तर, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा २७ फेब्रुवारीला लिहिला असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही राजीनामे २८ फेब्रुवारीला नायब राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते.

सिसोदिया यांनी तुरुंगातून हा राजीनामा टाइप केला नसावा, असे बोलले जात आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी हा राजीनामा लिहिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, सत्येंद्र जैन यांचा साधा आणि हस्तलिखित राजीनामा घेण्यात आला आहे का? सिसोदिया यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता आणि जैन यांनी २७ तारखेला दिला होता, तर राजीनाम्याची घोषणा एवढ्या उशिरा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या नेत्यांच्या नावांची मंत्रिपदासाठी शिफारस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप आमदार सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांच्या नावाची शिफारस  नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्याकडे मंत्रीपदासाठी केली आहे. आप सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर आपचे आमदार सौरभ भारद्वाज केजरीवाल सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. आतिशी यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी या दोघांना मंत्री म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव नायब राज्यपालांकडे पाठवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर सीबीआयने पकडलेले मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी तुरुंगात बंद असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांनीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांचे राजीनामेही स्वीकारले आहेत.

मनीष सिसोदिया यांचे सर्व १८ पोर्टफोलिओ दिल्ली सरकारचे मंत्री कैलाश गेहलोत आणि राजकुमार आनंद यांच्यात विभागले जातील. दुसरीकडे, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी दिल्ली सरकार आणि आप त्यांच्यासोबत उभे आहेत. यासोबतच आगामी काळात दिल्ली मंत्रिमंडळात दोन नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती सौरभ यांनी दिली.

मनीष सिसोदियांकडे १८ विभाग 
मनीष सिसोदियांकडे एकूण १८ विभागांचा पदभार होता. यामध्ये शिक्षण, वित्त, नियोजन, जमीन आणि इमारत, सेवा, पर्यटन, कला-संस्कृती आणि भाषा, जनजागृती, कामगार आणि रोजगार, सार्वजनिक बांधकाम विभाग याशिवाय आरोग्य, उद्योग, वीज, गृह, नगरविकास, पाटबंधारे आणि पूरनियंत्रण आणि जल विभाग यांचा समावेश आहे. सिसोदिया हे दिल्ली सरकारमधील सर्वात प्रभावशाली मंत्री होते. राज्य सरकारची सर्व प्रमुख मंत्रालये त्यांच्याकडे होती. सिसोदिया हे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सर्वात विश्वासू नेते आहेत.

सत्येंद्र जैन यांच्याकडे सहा खाती होती. सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर त्यांचे सहा विभागही सिसोदिया हाताळत होते. सत्येंद्र जैन दिल्ली सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. अटकेच्या जवळपास नऊ महिन्यांनंतर जैन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Delhi AAP Government New Minister Names


Previous Post

मालेगावमध्ये चोरट्यांनी चक्क वनविभागाच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले

Next Post

नाशिक आणि शिर्डी ही विमानतळे एकमेकाची स्पर्धक आहेत का? प्रवाशांना सेवा मिळणार की यातील एक बंद होणार?

Next Post

नाशिक आणि शिर्डी ही विमानतळे एकमेकाची स्पर्धक आहेत का? प्रवाशांना सेवा मिळणार की यातील एक बंद होणार?

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group