नवी दिल्ली ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय स्तरावर तीन बहु राज्य सहकारी संस्था स्थापन करण्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
सहकार हे एकमेव क्षेत्र आहे जे कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता या क्षेत्रात आहे, असे अमित शाह यांनी केलेल्या ट्विटच्या शृंखलेत म्हटले आहे. मात्र इतकी वर्षे या क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे क्षेत्र बळकट करण्यास सुरुवात केली.आज मंत्रिमंडळाने या क्षेत्राच्या हिताचे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असे शहा यांनी सांगितले.
या निर्णयामुळे सहकार क्षेत्राला नवे सामर्थ्य मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.”,असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीयस्तर या तीन मल्टी स्टेट कोआपरेटिव सोसाइटी बनणार
१. मल्टी स्टेट को. बीज सोसाइटी
२. मल्टी स्टेट को. ऑर्गेनिक सोसाइटी
३. मल्टी स्टेट को. एक्सपोर्ट सोसाइटी
https://twitter.com/AmitShah/status/1613136509192015874?s=20&t=zukojvMsPh_Bk94j-mSREQ