बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीदत्त परिक्रमेतील महत्वपूर्ण त्रिस्थली : श्रीक्षेत्र कुडूत्री, माणगाव आणि बाळेकुंद्री; असे आहे त्यांचे महत्त्व

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 20, 2022 | 5:03 am
in इतर
0
balekundri e1668867008916

 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा – भाग ४ 
श्रीदत्त परिक्रमेतील महत्वपूर्ण त्रिस्थली
श्रीक्षेत्र कुडूत्री, माणगाव आणि बाळेकुंद्री

श्री दत्त परिक्रमेबाबत सध्या आपण माहिती घेत आहोत. आतापर्यंत आपण प्रारंभीच्या सहा ठिकाणांची माहिती आपण घेतली. आता आपण पुढील तीन महत्त्वांच्या ठिकाणांची माहिती घेणार आहोत. ती म्हणजे श्री दत्त परिक्रमेतील महत्त्वपूर्ण त्रस्थली श्रीक्षेत्र कुडूत्री, माणगाव आणि बाळेकुंद्री. या स्थांनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते नेमके काय, यासह अन्य बाबी आता आपण जाणून घेऊया…

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

७) श्रीक्षेत्र कुडूत्री : प. पू. गुळवणी महाराज यांचे जन्मस्थान
गेल्या शतकातील अनेक साक्षात्कारी साधू-संतामध्ये दत्तसंप्रदायी प. पू. गुळवणी महाराजांचे विशेष स्थान आहे. कोल्हापुर पासून जवळच असलेले कूडूत्री नावाचे लहानसे गाव हे महान दत्तयोगी प. पू. योगिराज श्रीगुळवणी महाराज यांचे जन्मस्थान आहे. गुरुमाऊली प. पू. योगीराज गुळवणी महाराजांचे पणजोबा कोल्हापूर जवळ कौलव या गावात परंपरागत वैदिक व्यवसाय करत होते. प. पू. नारायणस्वामीनी त्यांना अनुग्रह दिला होता, म्हणून प. पू नागेशरावांना जी पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्याचे नांव त्यांनी नारायण ठेवले श्री नारायण भटजीना जो पुत्र झाला त्याचे नाव त्यांनी दत्त ठेवले. श्री दत्तोपंत भटजी कुलाचार संपन्न व शास्त्रोक्त विधी निष्ठेने करणारे वैदिक होते. त्यांची दुसरी पत्नी उमा हिच्या सह श्री दत्तोपंतानी डोंगर उतारा वरील निसर्गरम्य अशा कुडुत्री गांवी स्थलांतर केले.

कोल्हापूर जवळील कुडूत्री या छोट्याश्या गावी श्री. दत्तात्रय नारायण गुळवणी व सौ. उमाबाई हे आचारसंपन्न व सात्विक कुटूंब राहात होते. सौ. उमाबाई यांच्या कडक उपासनेमुळे प्रसन्न होऊन श्री दत्तप्रभूंनी अष्टागंधयुक्त पादूका पुडीतून त्याच्या ओटीमध्ये घातल्या. कालांतराने सौ. उमाबाईनां दिवस गेले व वामनरावांचा १३ डिसेंबर १८८६ रोजी जन्म झाला. पुढे वामनरावांचे शिक्षण तारळे व कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये झाले. लहान पणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. चित्रकलेच्या तिसऱ्या ग्रेडच्या परीक्षेसाठी त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळवला. दिवाळीच्या सुटीत गावी आले. त्यावेळी प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींचे नरसोबावाडीला पहिले दर्शन लाभले.

कुडूत्री येथे गूळवणी महाराजांचा मठ आहे. प,प,श्री कालिकानंदतीर्थ स्वामीजी यांनी श्री क्षेत्र कूडूत्री तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे श्रीसद्गुरु सिद्धयोग योगिराज १००८ श्री गूळवणी maharaj न्यासाची (ट्रस्ट) ची स्थापना करून या क्षेत्राचा विकास केला श्रीदत्त परिक्रमेत या मठाचे आवर्जुन दर्शन घेतले जाते..
संपर्क: श्रीक्षेत्र कुडूत्री प,पू.गूळवणी महाराज जन्मक्षेत्र
भक्त निवास मोबाईल- ९४०४२५६७१७ / ९०९६९०११७५
बाजीराव चौगुले-मोबा. ९४०३४६३३७३/९६६५१४०२२३

८) श्रीक्षेत्र माणगाव: प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान
श्री क्षेत्र माणगांव हे सिंधूदूर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. गाव अतिशय छोटेसे असले तरी ती पूण्यभूमी आहे. योगीराज प. पु. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे हे जन्मगाव. दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ. रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी माणगावी स्वामीचा जन्म झाला. ते दत्तअवतारी सिध्द पुरुष होते. कारण गणेश शास्त्रींना गाणगापूरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता.

श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ. स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला. त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही. त्यांना सर्व विद्या अवगत होत्या. श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य, मंत्रसिध्द, यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी, वक्ते, हठयोगी, उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते.
एकच खंत वाट्ते की, त्यांना संसार सुख लाभले नाही. जन्मताच मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते. पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला. स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या. अशा महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४ मधे समाधी घेतली.

माणगाव हे क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे. सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा लागतो. तिथे उतरून बस मार्गाने ७ कि. मी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते. सावंतवाडी साठी कोल्हापूरवरून नियमीत बससेवा आहे. या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.
संपर्क : श्री दत्तमंदीर, माणगांव पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधूदुर्ग, महाराष्ट्र ४१६५१९.
फोन: ०२३६२-२३६०४५, २३६२४५ मोबा. ९४२११९१००४/ रामचंद्र गाणपत्ये ९४२३८८११०३

९) श्री क्षेत्र बाळेकुंद्री – प. पू. पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे समाधी मंदिर
बेळगावच्या पूर्वेस बेळगावपासून बागलकोट रस्त्यावर सुमारे १२ कि. मी. अंतरावर पूर्वीच्या सांगली संस्थानापैकी बाळेकुंद्री बुद्रुक या नावाचे खेडे आहे. हा गाव त्यावेळीच्या सदर्न मराठा रेल्वेस्टेशन सुळे भावीपासून ३ कि. मी. अंतरावर आहे. यागावी पूरातन श्रीरामेश्र्वराचे जागृत देवस्थान आहे. येथे दोन-चार तलाव असून अंदाजे ५’ – ७’ खोलीवर मुबलक अमृततुल्य पाणी लागते. त्यामुळे येथे गुप्तगंगा आहे अशी अख्यायिका आहे.

येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे. अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील (इ. स. १८५५ ते १९०५) संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी श्रीबालमुकुंद तथा बालावधूत-पाश्र्ववाड, जिल्हा बेळगांव, यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपंतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला. पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला. श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरूंनी पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.

नरसिंह मंदीर : याठिकाणी श्री पंत मंदिराचे पिछाडीस नरसिंह मंदीर आहे; त्या ठिकाणी श्री पंतांचे आजोबा, श्री बाळकृष्ण महाराज व श्रीपंतमहाराजांची समाधी आहेत. पंत महाराजांच्या पूण्यतिथी उत्सवाची श्री प्रेमध्वजाची मिरवणूक येथूनच निघते. श्रीपंत महाराजांचा पार्थिव देह ज्या पवित्र अग्नीनारायणाला समर्पित केला त्याचे प्रज्वलीत शेष अवधूत मठीत कायम प्रदिप्त असून भक्तमंडळी येथीलच पवित्र विभूती घेऊन जातात.
या क्षेत्री सभागृह, भक्त निवास, भोजन कक्ष इ. स्थाने अत्यंत पवित्र आणि रमणीय आहे. श्री गुरूपादुका व श्री महाराजांच्या पादुकांवर अभिषेक लघूरुद्र पूजा इ. सेवा भक्त करू शकतात.
संपर्क श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री, श्रीक्षेत्र बाळेकुंद्री बेळगाव.
भक्त निवास – सुधाकर खोत मोबा. ०९६११३७७६०५/०९४४८२८८९९१
दूरध्वनी : (०८३१) २४१८२४७ / २४१८४८०/ ३२९५७४४ www.panthmaharaj.com

श्रीदत्त परिक्रमेत आज आपण प.पू. गूळवणी महाराजांचे जन्मस्थान कुडूत्री, प.पू.वासुदेवानंद सरस्वती यांचे जन्मगाव माणगाव आणि प.पू.श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे कार्यक्षेत्र श्री क्षेत्र बाळेकुंद्री या दत्त स्थानांचे दर्शन घेतले.उद्या आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांचे लीलास्थान असलेल्या कुरवपुर येथे जावू या!

(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com/ श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Datta Parikrama Kudutri Mangav and Balekundri by Vijay Golesar
Shree Dattatray Maharashtra Karnataka Religious

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – अशाच गोष्टी तू मला दे

Next Post

अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट होणार? अखेर तिने शेअर केली ही पोस्ट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
Manasi Naik e1685102538310

अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट होणार? अखेर तिने शेअर केली ही पोस्ट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011