India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट होणार? अखेर तिने शेअर केली ही पोस्ट

India Darpan by India Darpan
November 20, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केवळ अभिनेत्री नाही तर एक उत्तम नर्तिका म्हणून मनोरंजन विश्वात मानसी नाईक हे नाव प्रसिद्ध आहे. ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ अशा या गाण्यांमधून ती भलतीच लोकप्रिय झाली. नृत्य करताना तिच्या चेहऱ्यावरचे असणारे भाव, डोळ्यांची अदा यामध्ये मानसी अगदी पारंगत आहे. तिच्या नृत्य कौशल्याची कायम चर्चा होत असते. सध्या मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मानसीने तिचे आणि प्रदीपचे एकत्र फोटोही डिलीट केले होते. त्यानंतर तिने खरेरा हे आडनावही हटवलं आहे. यामुळे ती लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे चित्र होते. याबाबत खुद्द मानसीनेच खुलासा केला आहे.

मानसी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच तिने तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट केली आहे. यातील बहुतांश पोस्ट भावूक असल्याचे दिसते आहे. तिचे वैवाहिक आयुष्य बिघडल्याची चर्चा होती. यातच तिने एक स्टोरी पोस्ट करून यावर खुलासा केला आहे. यानुसार तिने म्हटले आहे की, आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात जे तुमच्यासाठी सतत खंबीरपणे उभे राहतात. तुम्ही जे जसे आहात, तसे ते तुम्हाला स्वीकारतात आणि त्याबद्दल त्यांच्या मनात तुमच्याविषयीच आदरच असतो. ते तुमच्यासाठी लढतात. तुम्हाला सहभागी करुन घेतात. तुम्हाला प्रोत्साहन देतात. काहीही झालं तरी ते तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. पण माझ्या आयुष्यात अशी काही माणसं अपवादाने आली की ज्यांनी मित्राचा बुरखा घेतलेला होता. मात्र त्यांनी वरीलपैकी कोणतीही गोष्ट केली नाही, असे ती म्हणते.

मानसीने पुढे म्हटले आहे की, माझ्या कठीण काळात माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भातील माहितीचा कोणी गैरवाजवी उपयोग करत असेल तर कृपया त्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. ही विनंती सर्वांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आहे”, असे मानसी नाईकने यात म्हटले आहे. मानसीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चर्चेत आहे. अनेकांना ही पोस्ट वाचून धक्का बसला आहे. तिने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचा तिच्या खासगी आयुष्याशी आणि घटस्फोटाशी संबंध जोडला जात आहे. यावर मात्र तिने काहीही स्पष्टीकरण केलेले नाही.

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ रोजी झालं. त्याआधी काही काळ दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

Marathi Actress Manasi Naik Divorce Social Post


Previous Post

श्रीदत्त परिक्रमेतील महत्वपूर्ण त्रिस्थली : श्रीक्षेत्र कुडूत्री, माणगाव आणि बाळेकुंद्री; असे आहे त्यांचे महत्त्व

Next Post

अहमदनगरातील सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

Next Post

अहमदनगरातील सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या बरोबर कांदा प्रश्नावर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा नाही….

September 26, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंताची चर्चा

September 26, 2023

आनंद महिंद्रा अडचणीत…याप्रकरणी गुन्हा दाखल

September 26, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींना नवीन संधीचा योग येईल… जाणून घ्या, बुधवार, २७ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 26, 2023

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group