गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला अशा दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 5, 2022 | 12:04 pm
in राज्य
0
Dasara Vijayadhashmi

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या दसरा सणानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा करावा, सर्वांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावे, अशी मानोकामना त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया – मुख्यमंत्री
विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा सण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येवो, त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, विजयादशमी म्हणजे वाईटावर विजय मिळविल्याचा आनंदोत्सव. कोविडच्या बिकट संकटावर मात केल्यानंतर खऱ्य़ा अर्थानं आपल्या सर्वांसाठी हा आरोग्याचा विजयोत्सवच आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्याला पुढे जायचे आहे. बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रातील प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालावी, अशी आकांक्षा आहे. या विकास पर्वातूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास आहे. या ध्यासपूर्तीसाठी आपण एकजूट करुया या आवाहनासह पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमी – दसरा सणाच्या मनापासून शुभेच्छा!

चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे – उपमुख्यमंत्री
विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, विजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचा, मांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावन पर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.

Dasara Blessings by CM, DYCM and Governor

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; पुढील वर्षापासून एवढा निधी मिळणार

Next Post

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने खरेदी केला नवा फ्लॅट; भरली एवढी स्टॅम्प ड्युटी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
G0e W1lXkAAWJGD
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

सप्टेंबर 11, 2025
G0f9gZ0aYAAJPQC e1757556321796
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

सप्टेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
Next Post
madhuri and shriram nene e1664952946954

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितने खरेदी केला नवा फ्लॅट; भरली एवढी स्टॅम्प ड्युटी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011