विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व संजय धोत्रे यांच्यावर गडातंर आले आहे. या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे डॅा. भारती पवार व मराठवाड्याचे भाजपचे राज्यसभेतील खासदार डॅा. भागवत कराड यांचे नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. या चारही खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पण, याबरोबरच दोन महाराष्ट्राचे मंत्रीला डच्चु देण्यात आला आहे. त्यात रावसाहेब दानवे व संजय धोत्रे यांचे नाव चर्चेत आहे.
सायंकाळी सहा वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संभाव्य मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे या गाठीभेटींनाही आज दिवसभर विशेष महत्त्व आले आहे. राज्यातील या चार खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कोणाचे मंत्रीपद जाते हा महत्त्वाचा विषय होता. त्यात दानवे व धोत्रे यांना डच्चु मिळाल आहे. त्यांनी आज राजीनामा दिला आहे.
या नव्या मंत्रिमंडळात ओबीसीचे २७, एसी १२ , एसटी ८, अल्पसंख्याक ५ , महिला ११ असणार असून त्यात वकील १३, डॅाक्टर ६, इजिनिअर ५, ब्यूरोक्रेट ७ असणार असल्याचे बोलले जात आहे.