डांगसौंदाणे (ता. सटाणा) – शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी महिला शेतकरी वर्गासाठी 30%आरक्षण देण्यात आले आहे. एकाचअर्जातून विविध कृषी योजनाचा लाभ आता शेतकऱ्याना होणार असल्याने एकच अर्ज करण्याची पद्धत कृषी विभागाने आणली आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे सर्व सामान्य जनतेपर्यंत कृषी विभागाच्या योजना पोहचत असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. त्यांनी डांगसौंदाणे येथे नर्मदेश्वर महादेव मंदिर सभामंडप उदघाटन सोहळ्या नंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत कृषी विभागाच्या विविध योजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे होते.
डांगसौंदाणे येथे आदिवासी विकास विभागाकडून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक भवन व महादेव मंदिर सभामंडपाचे उद्घाटन भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सटाणा बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे, शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे, तालुका प्रमुख सुभाष नंदन ,संजय सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांचा सत्कार डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना कृषी पीक विमाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आजपर्यंत मिळवुन दिले. शेतकरी हितासाठी कृषी विभाग विविध योजना राबवत आहे. 30% आरक्षण महिला शेतकऱ्यांना दिल्याने शेतकऱ्यांनी आता आपल्या सातबारा उताऱ्यावर घरातील महिलांच्या नावाचा समावेश करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करावी. शेतकरी गट स्थापन करावे. राष्ट्रीयकृत बँके मार्फत तीन लाख पर्यन्तचे पीक कर्ज हे बिनव्याजी मिळत असल्याची माहिती ना. भुसे यांनी दिली.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत बागलाण मध्ये शिवसेनेचे हात बळकट करण्यासाठी या भागातील जनतेने शिवसेनेच्या उमेदवारा बरोबर राहुन मदत करण्याचे आवाहन केले. या भागातील जनमाणसांचे नेतृत्व असलेले संजय सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या माध्यमातून या भागातील गोरगरीब आदिवाशी बांधवांची सेवा करण्यासाठी पुढे येण्याचे सांगितले. या भागासाठी कधी ही निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द देत या भागातील मूलभूत विकसासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महादेव मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या. या कार्यक्रमास माजी जि प सदस्या सिंधुताई सोनवणे सरपंच जिजाबाई पवार, माजी सरपंच वैशाली बधान, विजय सोनवणे, यशोदा सोनवणे, पंढरीनाथ बोरसे, रवींद्र सोनवणे डॉ सुधीर सोनवणे सोपान सोनवणे, मुरलीधर मुसळे,अनंत दिक्षित, पंकज बधान ,कडू सोनवणे, रमेश बोरसे, केदा बोरसे ,अण्णा काकुळते, देवेंद्र सोनवणे, मनोहर सोनवणे, गुलाब पगारे दिलीप जाधव, प्रभाकर सोनवणे, आबा देशमुख शरद केले,यांच्या सह असंख्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.