इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडच्या काही वर्षांत अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या घटना समोर येत असून, नृत्य कलाकारही त्याला बळी पडत आहेत. असेच एक प्रकरण जम्मूमधून समोर आले आहे, जिथे माता पार्वतीच्या भूमिकेत नाचत असताना एका कलाकाराला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा स्टेजवरच मृत्यू झाला. आणि आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ही घटना जम्मूच्या बिश्नेह तहसीलमधील आहे. या घटनेचा एक वेदनादायक व्हिडिओही समोर आला आहे. वृत्तानुसार, येथे जागरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी योगेश गुप्ता नावाचा व्यक्ती माता पार्वतीच्या भूमिकेत नाचत होता. तर दुसरा कलाकार भगवान शंकराची भूमिका करत होता आणि तो त्याच्या शेजारी उभा राहून वाट पाहत होता.
यादरम्यान अचानक माता पार्वतीच्या भूमिकेत नाचत असलेला योगेश गुप्ता खाली पडला पण पुन्हा उठला. त्यानंतर तो पुन्हा पुन्हा पडला. परंतु त्याला उठता येत नव्हते. अनेकांना वाटले योगेश हा भूमिकाच करीत आहे. आश्चर्य म्हणजे हा डान्स पाहणाऱ्यांसह स्टेजवरील कलाकारांनाही कळाले नाही की योगेशला हार्ट अटॅक आलाआहे. बराच वेळ योगेश उठत नसल्याने शंकराची भूमिका करणारा कलाकार त्याच्याजवळ गेला.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भगवान शंकराची भूमिका करणारा कलाकार त्याच्यापर्यंत पोहोचला आणि योगेशला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठू शकला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. योगेशला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. बघा, हा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ
https://twitter.com/Jasmeen66480371/status/1567782073225850882?s=20&t=EX6lj-kkn-zUot1mp5OOuA
Dancing Actor Death Due to Heart Attack on Stage Shocking Video