निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा आज येथे कार्यक्रम होता. त्यासाठी ती आली होती. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. याच कार्यक्रमाच्या प्रारंभी गौतमी पाटील हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर तिने पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गौतमी पाटील कपडे बदलत होती. त्याचवेळी कुणीतरी हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी म्हणाली की, पुण्यातील त्या घटनेबाबत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कारवाई सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. त्याबद्दल मला चांगले वाटले. मात्र, यापेक्षा अधिक काही मला बोलायचे नाही, असे गौतमी पाटीलने म्हटले आहे.
Dancer Gautami Patil Reaction After Video Viral
Nashik Niphad