नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ५२ टक्के साठा असून भावली, वालदेवी नांदूमध्यमेश्वर ही तीन धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तर ११ हून अधिक धरणात ५० टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ७६ टक्के आहेत. तर समुहात ६९ टक्के साठा आहे . नागासाक्या, भोजापूर,. पुणेगाव व तिसगाव धरणात मात्र सर्वात कमी साठा असून तो चिंता वाढवणारा आहे.