इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
ग्राहक, कस्टमर केअर आणि कॉल सेंटर
ग्राहक राजा जेव्हा जेव्हा आपणावर अन्याय होतो तेव्हा अजिबात गप्प बसू नका. बरेच ग्राहक हे केवळ कस्टमर केअरला फोन करतात/कॉल सेंटरला फोन करतात आणि विक्रेत्याने/कंपनीने काहीही केले नाही तर परत फक्त फोनवर फोन करत बसतात आणि आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात. अशावेळी तुमच्याकडे कुठला सक्षम पर्याय आहे हे आपण आता जाणून घेऊया….
कस्टमर केअर किंवा कॉल सेंटरला फोन करणे, केवळ कंपनीला किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना तोंडी/फोनवर शिव्या देणे, फोनवर भांडणे याने आपले प्रश्न सुटत नाहीत.
जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण आधी कस्टमर केअरला/कॉल सेंटरला फोन करून तक्रार जरूर करा पण केवळ हाच मार्ग न अवलंबता आपण अनेक मार्ग अवलंबले पाहिजेत.
काही ग्राहक फक्त ईमेल करून मोकळे होतात परंतु ग्राहक राजा आपल्या कडील कित्येक कंपनी या कस्टमर केअर चे ईमेल उघडून पण पहात नाहीत, तेव्हा ग्राहक राजा केवळ फोन करणे तेही दिलेल्या कॉल सेंटरला किंवा कस्टमर केअर ला याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. शिवाय फक्त ईमेल करून पण आपले प्रश्न सुटणार नाहीत. कारण अजून आपल्या कडील कंपनी या ग्राहकाला पाहिजे तशा सेवा देत नाहीत. आपण त्यासाठी थोडे लेखी स्वरूपात पोस्टाने ते ही रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट याने तक्रार करायला पाहिजे.
आपण लेखी स्वरूपात तक्रार करणे मुळे सदर रेकॉर्ड आपल्या कडे राहते. तक्रार करताना एक पथ्य पाळायचे की सदर पत्र लिहीत असताना त्यात आपले पूर्ण नाव, पत्ता, ईमेल, फोन नंबर आणि तारीख लिहायचे विसरू नका. कित्येक लोक लांब लचक तक्रार करतात पण आपल्याला सदर कंपनी ने कसे कॉन्टॅक्ट करायचे हे लिहीत नाही म्हणजे आपला पत्ता, ईमेल किंवा फोन नंबर लिहीत नाहीत. त्यामुळे ग्राहकाने दिलेल्या पत्रावर उत्तर कुठे द्यायचे असे कंपनीला प्रश्न पडू शकतात आणि त्यामुळे ग्राहकाचे प्रश्न सुटत नाहीत. काही वेळेला ग्राहक पत्रावर तारीख टाकत नाहीत त्यामुळे आपण पत्र कधी पाठवले हे समजत नाही.
पत्रावर सही करणे देखील जरुरी आहे. शिवाय आपण पत्र लिहिताना पत्र हे डिलर, विक्रेता आणि उत्पादक या सर्वांना दिले पाहिजे. कारण ग्राहक कायदा २०१९ नुसार हे सर्व संयुक्त रित्या ग्राहकांना सेवा देणे साठी बाध्य आहेत.
वास्तविक ईमेल दिल्यावर परत पत्र पाठवणे ची जरुरी नाही कारण ईमेल डिलिव्हरी नोट आपणास प्राप्त होते. कित्येक लोक हे ऑनलाईन बऱ्याच गोष्टी करतात त्यामुळे ते ईमेल पाठवली की आपण तक्रार केली आहे आता कंपनी ने ती सोडवली पाहिजे असे समजतात. परंतु आपल्या कडे 50% कंपनी या ईमेल बाबत उदासीन आहेत. ईमेल आयडी देणे कायद्याने बंधन कारक आहे परंतु त्यासाठी लागणारा स्टाफ ठेवला जात नाही. रूटीन मध्ये ईमेल चेक केले जात नाहीत किंवा चेक केले तरी त्याला उत्तर दिले जात नाही.
परंतु अजून पण कित्येक कंपनी मध्ये जेव्हा लिखित स्वरूपात पोस्टाने पत्र जाते तेव्हा त्याची दखल घेतली जाते कारण त्यांना हे चांगले माहीत असते की आता आपल्याला पत्र पोहोचले याचा पुरावा ग्राहकाकडे आहे. अजून पण कित्येक कंपनी या जुन्या जमान्यातील जुन्या विचार सरणीच्या आहेत.
पोस्टाने पत्र पाठवणे मुळे आपल्याला पोस्टाचे वेबसाईट वर चेक करता येते की आपले पत्र कधी डिलिव्हरी झाले आहे. त्यासाठी आपणास www.India post.gov.in या पोस्टाचे वेब साईट वर जे पत्र आपण रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने पाठवले आहे त्याच्या रिसिप्ट वर जो आर्टिकल नंबर असतो तो नंबर टाकला की आपणास आपले पत्र कधी कुठे होते आणि कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी दिले गेले याची माहिती मिळते.
आपण सदर माहिती डाऊन लोड करून किंवा प्रिंट आऊट घेऊन ठेवावी म्हणजे गरज पडली तर आपणास कोर्टात जायला पुरावा मिळेल.
तेव्हा आपण अगदी छोटी वस्तू घेतली आहे किंवा मोठी वस्तू घेतली आहे आणि आपणास ग्राहक सेवा दिली गेली नाही किंवा सदोष वस्तू दिली गेले आहे त्यावेळी आपण लेखी स्वरूपात त्याबाबत तक्रार जरूर करा. केवळ कस्टमर केअर किंवा कॉल सेंटरला फोन करून उपयोग नाही कारण तिथे पढवून ठेवलेले लोक नियुक्त केलेले असतात. त्यांना ठराविक प्रश्नाला ठराविक उत्तर द्यायचे याचे प्रशिक्षण दिलेले असते त्याच्या बाहेर ते उत्तरे देत नाहीत.
ग्राहक कित्येक वेळेला सेवा देत नाहीत, आपली तक्रार ऐकली जात नाही, तक्रार सोडवली जात नाही म्हणून चिडून जाऊन सदर कॉल सेंटर किंवा कस्टमर केअर वर फोन अटेंड करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करतात. असे करणेने आपले प्रश्न सुटत नाहीत तर ते वाढू शकतात. आपणाशी जे बोलणे होत असते त्याचे कॉल रेकॉर्डिंग /संभाषण हे सदर कंपनी कडे असते त्यामुळे ग्राहकांवर सदर कंपनी मानहानीचा/शिवीगाळ केल्याची तक्रार/ दावा ठोकू शकतात.
तेव्हा ग्राहक राजा जागा हो आणि आपले हक्क तर समज शिवाय आपण आपले प्रश्न कसे सोडवायचे हे देखील समजून घे.
सर्व ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार करायची सवय लावून घे कारण फक्त फोन वर बोलले किंवा अगदी आपल्याकडे फोन चे रेकॉर्डिंग देखील आहे तरी सदर रेकॉर्डिंग हे कोणत्या दोन व्यक्ती मधील आहे आणि ते खरे आहे की खोटे हे सिद्ध करणे ची जबाबदारी ही ग्राहकाची असते. ग्राहकाने कोर्टात पुरावा म्हणून जर फोन रेकॉर्डिंग दिले तर त्याची फॉरेनसिक चाचणी करणे, आवाजाची चाचणी करणे इत्यादी खूप खर्चिक असते. हे सर्व सिद्ध करणे देखील खूप कठीण असते त्या पेक्षा लेखी दिल्याने पुरावे देणे सोईस्कर आहे.
तेव्हा नुकताच जागतिक ग्राहक दीन हा १५ मार्चला झाला आहे तेव्हा आता सजग हो. सर्व लेखी स्वरूपात लिहीत जा. आणि वेळ पडली तर ग्राहक आयोगात नक्की जा तुला न्याय जरूर मिळेल. थोडा विलंब होईल पण न्याय जरूर मिळेल.
आपल्याला कोणत्याही बाबतीत तक्रार कशी करायची यासाठी मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आपल्या जिल्ह्यातील लोकांचे मार्गदर्शन घेऊ शकता. अगदी मोफत
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
अधिक माहितीसाठी संपर्क
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम. वंदना तोरवणे, मो .9156972786
Customer Care Call Centre Harassment Strong Alternative by Vijay Sagar