नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर नोकरीसाठी इच्छुक असाल आणि त्यातही तुम्हाला देशसेवा करायची असेल तर तुमच्यासाठी अत्यानंदाची बातमी आहे. कारण, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) मध्ये तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची भरती केली जाणार आहे. त्याची अधिसूचना गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण १,२९,९२९ पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी १,२५,२६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि ४,४६७ पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, १० टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा माजी लष्करी कर्मचार्यांच्या बाबतीत समकक्ष लष्करी पात्रता असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
CRPF Bumper Recruitment 1 Lakh Post Vacancy Job