इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या सूरत शहरातील गोदरा परिसरात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या राहणाऱ्या एका तरुणीला आणि तिच्या प्रियकराने बंधक बनवून आपल्या वासनेची शिकार बनविले. सामूहिक बलात्काराची घटना रविवारी घडली आणि मंगळवारी उघडकीस आली. त्यानंतर पुनागाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणांचा शोध सुरू केला आहे.
२७ वर्षीय तरुणी तिच्या प्रियकरासोबत फिरायला गेली होती. दोघेही सायंकाळी उशिरा सोमसोम रस्त्यावरील देवध रधुवीर बाजार येथून कुंभरिया गावाकडे जात होते. त्यादरम्यान तेथे आलेल्या पाच तरुणांनी त्याला घेरले आणि धमकावले. त्याचवेळी या तरुणांनी प्रियकर आणि प्रेयसीला बळजबरीने जवळच्या केळीच्या शेतात नेले.
येथे आरोपींनी तरुणीच्या प्रियकराला बेदम मारहाण करून बांधले. त्यानंतर तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याबाबत दोघांनीही कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन हे पाचही जण पळून गेले. ते निघून गेल्यानंतर कसेबसे दोघेही शेतातून बाहेर पडून तरुणाच्या दुचाकीजवळ आले. तरुणाने रात्री मुलीला तिच्या घरी सोडले. मुलगी घरी पोहोचल्यावर तिने याबाबत कुणालाच काही सांगितले नाही.
मात्र दुसऱ्याच दिवशी तिने सामूहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी लिंबायत पोलीस ठाणे गाठले. प्रथम तिने आपले प्रेमप्रकरण लपवण्यासाठी पोलिसांना खोट्या बाबी सांगितल्या. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा तिने सर्व हकीकत सांगितली. तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीने सांगितले की, आरोपीने तरुणीचा आणि तिच्या प्रियकराचा मोबाईल हिसकावून घेतला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपास सुरू केला आहे.
Crime Young Girl Gang Rape In front of Boyfriend