India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ऐतिहासिक! सह्याद्री फार्म्समध्ये तब्बल ३१० कोटींची युरोपीय गुंतवणूक; शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीचा विक्रम

India Darpan by India Darpan
September 14, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची १०० टक्के मालकी असलेल्या सह्याद्री पोस्ट केअऱ लि. या कंपनीमध्ये रू.३१० कोटींची थेट परकिय गुंतवणूक युरोपातील गुंतवणूकदारांच्या समूहाने केली आहे. इंकोफिन- Incofin, कोरीस- Korys, एफएमओ- FMO आणि प्रोपार्को- Proparco यांचा या गुंतवणुकदारांमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांना आपला व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत स्वरूपात चालविण्याच्या सहयाद्री फार्म्सच्या भूमिकेवर या गुंतवणूकीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत (एंड -टू -एंड) सहाय्य प्रदान करणारे सह्याद्री फार्म्स हे ग्रामीण उद्योजकतेचे उत्तम उदाहरण आहे. सन २०१० मध्ये दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत द्राक्षे युरोपात निर्यात केली. हाच छोट्या शेतकऱ्यांचा समूह आज सह्याद्री फार्म्सच्या रुपाने भारतातील आघाडीची फळे आणि भाजीपाला निर्यात आणि प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे. नऊ पिके, १८ हजार शेतकरी आणि ३१ हजार एकरहून अधिक क्षेत्रावर सह्याद्री फार्म्सचा विस्तार झाला आहे.

संलग्न शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या पिकांची निवड करण्यापासून पीक पद्धतीचे मार्गदर्शन, शेतकरी वापरत असलेल्या कृषी निविष्ठा (इनपूट्स), पीक काढणी आणि विक्री या सर्व टप्प्यांवर सह्याद्री फार्म्सची साथ असते. या प्रक्रियेत सह्याद्रीने फार्म्सने एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च-उत्पन्न देणार्‍या पिकांच्या जाती, बियाणे, खते, कीडनाशके आदी कृषी निविष्ठा, प्रत्यक्ष (रिअल टाइम) हवामानाची माहिती आणि कृषिमाल बाजारपेठेत नेण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती पुरविण्यात येते.

सह्याद्री फार्म्समुळे छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तन होत आहे. श्री. नामदेव पवार हे त्यातलेच एक शेतकरी आहेत. ते सांगतात, ‘‘२०१२ मध्ये मी जवळपास शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. अशा वेळी सह्याद्रीने मला आधार दिला व पुन्हा शेती व्यवसाय करण्यासाठी मी प्रेरीत झालो. सह्याद्रीमुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली. २०१४ मध्ये मी बँकेचे कर्जही फेडले.’’

सह्याद्री फार्म्सशी संलग्न असलेल्या अनिल डावरे यांचाही असाच अनुभव आहे. ते सांगतात, ‘‘माझ्याकडे एक एकरपेक्षा कमी शेती आहे. माझ्या शेतजमिनीच्या एका भागात घर आणि जनावरांचा गोठा आहे. सह्याद्रीसोबत जोडला जाऊन शेती केल्याने मी यशस्वी ठरलो. मुलाने उत्पादित केलेला शेतमाल परदेशात निर्यात होऊ शकतो, अशी माझ्या आईवडिलांनी कधीही कल्पना केली नव्हती. मात्र ते शक्य झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही.”

कोरीस, एफएमओ, प्रोपार्को आणि इंकोफिन यांच्याकडून सह्याद्री फार्म्समध्ये केली जाणारी भांडवली गुंतवणूक ही शेतकऱ्यांच्या कंपनीची आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे तसेच प्रक्रियापश्चात कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्लांट आणि पॅकहाऊससारख्या पायाभूत सुविधा वाढवायच्या आहेत. त्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला जाईल. गुंतवणुकीच्या या प्रक्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्री फार्म्ससाठी विशेष धोरणात्मक सल्लागार (स्ट्रँटेजिक ॲडव्हायजर) म्हणून काम केले.

‘‘शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना उद्योजकांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या विचारप्रवृत्त करणे ही सह्याद्री फार्म्सची मूळ संकल्पना आहे. प्रत्येक लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर आणि व्यावहारिक व्यवसाय बनावा या उद्देशाने आम्ही एक शाश्वत, मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी सक्षम अशी संस्था विकसित करीत आहोत.’’
– विलास शिंदे, संस्थापक (शेतकरी) आणि व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स.

“ इंकोफिन ला गुंतवणूकदार संघाचे आणि सह्याद्री फार्म्स सोबतची भागीदारी विकसित करण्यासाठीचे नेतृत्त्व करताना अभिमान वाटतो आहे. भागीदारी आधारित दृष्टिकोनातून विकसित झालेल्या सह्याद्री फार्म्सच्या संकल्पनेचा कृषी क्षेत्रात वैश्विक रोल मॉडेल म्हणून प्रसार व्हावा, ज्यातून शाश्वत आर्थिक परिणाम, हवामान बदलासाठी अनुकूलन आणि ग्रामीण समुदायात सर्वसमावेषक विकास साध्य करताना शेती क्षेत्र तंत्रज्ञान आधारित आणि जागतिक स्पर्धाक्षम व्यवसाय होईल.’’
– राहुल राय, पार्टनर (इंकोफिन इंडिया)

‘‘भारतातील छोट्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सह्याद्री फार्म्सच्या रुपाने दीर्घकालीन भागीदार मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. शेतकर्‍यांना त्यांचा व्यवसाय भरभराटीस आणण्यासाठी कोणती मदत आवश्यक आहे हे ओळखून ती मदत करण्याच्या सह्याद्री फार्म्सच्या क्षमतेने आम्ही प्रभावित झालो आहोत. भारतातील शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या एका संस्थेमध्ये झालेली ही पहिली आंतरराष्ट्रीय भांडवली गुंतवणूक आहे. सह्याद्री फार्म्सला आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास आणि कृषी उद्योगाच्या पुढील वाढीसाठी ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल.’’
– मायकेल जोन्गेनील, मुख्य कार्यकारी अधिकारी, एफएमओ

‘‘फळे आणि भाजीपाला क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यावसायिकांपैकी एक असलेल्या सह्याद्री फार्म्सचा इंकोफिन, कोरीस आणि एफएमओ यांच्याप्रमाणे भागधारक बनल्याचा ‘प्रोपार्को’ला अभिमान आहे. ही गुंतवणूक अभिनंदनीय आहे. जबाबदार दृष्टिकोनासाठी वचनबद्ध असलेल्या अग्रगण्य भारतीय कृषी कंपनीतील या गुंतवणुकीमुळे अनेक सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणपूरक परिणाम होणार आहेत. सुरुवातीला जवळपास १५ हजार शेतकरी आधुनिक पुरवठा साखळीत प्रवेश करण्यासाठी सक्षम होतील. ज्यामध्ये पुनर्निर्मित शेती पद्धती आणि दर्जेदार उपकरणे उपलब्ध होतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादने आणि त्यांची गुणवत्ता वाढवता येईल, शेतीचे नुकसान कमी होऊन आणि कीटकनाशके आणि खतांचा वापर कमी होईल. हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठीच्या ठोस उपाययोजना राबविण्यासाठी सह्याद्री फार्म्स या गुंतवणुकीमुळे सक्षम होईल. शिवाय अक्षय (पुनर्निर्मित) ऊर्जा उत्पादनातील आपला हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक वाढवून शेवटी शून्य कचरा (झीरो वेस्ट) धोरणाची अंमलबजावणीही शक्य होईल.’’
– फ्रँकोइस लोम्बार्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘प्रोपार्को’

‘‘सह्याद्री फार्म्सचे भागीदार होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कारण हे असे शाश्वत मॉडेल आहे की ज्यात शेतकरी समुदाय आणि पर्यावरणविषयक जागरुकता यावर भर दिला आहे. सह्याद्रीची वाटचाल शेतकरी ते उद्योजक बनण्याच्या एका प्रेरक कहाणीत गुंफलेली आहे. ज्यांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करुन पारंपरिक भारतीय शेतीचे रूपांतर करण्याचा दृष्टीकोन अंगिकारला आहे. सह्याद्रीचे संस्थापक आणि मॅनेजमेंट टीम प्रगत डिजिटल सोल्यूशन, व्यावसायिक वैविधतेने परिपूर्ण अशा परिपूर्ण कृषी मूल्यसाखळीत पारदर्शकता आणण्यात आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या नेतत्वाखालील शेतकऱ्यांची कंपनी म्हणून विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे. ’’
– हरी सुब्रमण्यम, पार्टनर (कोरीस, इंडिया)

इंकोफिन इन्व्हेसमेंट मॅनेजमेंट
इंकोफिन एक स्वायत्त स्वतंत्र उदयोन्मुख बाजारकेंद्रित प्रभाव गुंतवणूक (इम्पॅक्ट इन्व्हेसमेंट) भांडवल व्यवस्थापक आहे. ज्याचा मुख्य भर वित्तीय समावेशन, कृषी-अन्न मूल्यसाखळी आणि सुरक्षित पेयजल यावर आहे. सर्वसमावेशक प्रगतीला चालना देणे हा इंकोफिनचा उद्देश आहे. इंकोफिन इन्व्हेसमेंट मॅनेजमेंट हा एक AIFM परवानाधारक फंड व्यवस्थापक आहे. त्याच्या व्यवस्थापनाखाली एक अब्ज युरो पेक्षा अधिक मालमत्ता आहे. इंकोफिन च्या बेल्जियम स्थित मुख्यालयात ८० हून अधिक जणांची प्रोफेशनल टीम आहे. भारत, कोलंबिया, केनिया आणि कंबोडिया येथे इंकोफिन ची स्थानिक गुंतवणूक टीम आहे.
एक अग्रगण्य इम्पॅक्ट इन्व्हेसमेंट संस्था म्हणून इंकोफिन ने आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन आणि पूर्व युरोपातील ६५ देशांमधील कृषी-अन्न मूल्यसाखळीत ३२० हून अधिक गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आणि छोट्या व मध्यम एंटरप्राइजेस (SMEs) मध्ये २.७ अब्ज युरो पेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.

प्रोपार्को विषयी…
प्रोपार्को ही एजन्स फ्रँकाइस डी डेव्हलपमेंट ग्रुप (एएफडी ग्रुप) ची खाजगी क्षेत्रात वित्तपुरवठा करणारी उपकंपनी आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून शाश्वत आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाला प्रोपार्को चालना देत आहे. प्रोपार्को कंपनी आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्य-पूर्वेतील व्यवसाय आणि वित्तीय संस्थांना वित्तपुरवठा आणि सहाय्य प्रदान करते. प्रोपार्को चा मुख्य भर पायाभूत सुविधा, मुख्यकरुन अक्षय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी), कृषी व्यवसाय, वित्तीय संस्था, आरोग्य आणि शिक्षणावर आहे.
२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाने शाश्वत विकास उद्दिष्टे (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल) साध्य करण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग बळकट करण्यावर भर दिला होता. रोजगार निर्माण करुन सन्मानजनक उत्पन्न मिळवून देणाऱ्या, त्यासाठी अत्यावश्यक सोयीसुविधा व साधने पुरविणाऱ्या आणि हवामान बदलाशी मुकाबला करण्यात योगदान देणाऱ्या कंपन्यांना प्रोपार्का वित्तपुरवठा करते.

FMO विषयी…
FMO ही डच उद्योजक विकास बँक आहे. एक प्रमुख प्रभावशील गुंतवणूकदार म्हणून, FMO विकसनशील देशांमध्ये आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि उद्योजकांमध्ये गुंतवणूक करून शाश्वत खाजगी क्षेत्राच्या वाढीला सहकार्य करते. एक मजबूत खाजगी क्षेत्र आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे नेऊ शकते असा FMO चा विश्वास आहे. माणसाच्या कौशल्याचा वापरुन करुन त्यांचे जीवन अधिक दर्जेदार करण्याच्या कार्यात FMO चा गेल्या पन्नासहून अधिक वर्षांचा लौकिक आहे. FMO मुख्यत्वे उच्च विकासावर प्रभाव करणाऱ्या १)वित्तीय संस्था, २)ऊर्जा आणि कृषी व्यवसाय, ३)अन्न आणि पाणी या तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करते. ८५ देशांमध्ये पसरलेल्या १२ अब्ज युरो एकूण प्रतिबद्ध पोर्टफोलिओसह FMO ही जागतिक स्तरावरील मोठी द्विपक्षीय (बायलॅटरल) खाजगी क्षेत्रातील डेव्हलपमेंट बँकांपैकी एक आहे.

कोरीस- Korys विषयी…
कोरीस-Korys ही कोलरुइट – Colruyt समूहाची गुंतवणूक कंपनी आहे. सद्यस्थितीत कंपनीच्या व्यवस्थापनाखाली ४.५ अब्ज युरो पेक्षा अधिक मालमत्ता आहे. बेल्जियम आणि फ्रान्समधील अग्रगण्य रिटेल कंपनी असलेल्या कोलरुइट ग्रुपमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी व्यतिरिक्त कोरीस कंपनी खासगी कंपन्या आणि खाजगी इक्विटी फंडांचे सक्रियपणे व्यवस्थापन करते. कंपनीने सूचीबद्ध (लिस्टेड) गुंतवणुकीचा पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वनिधी कोष देखील स्थापन केला आहे. आपल्या सर्व उपक्रमांत कोरीस चे गुंतवणुकीचे निर्णय दीर्घकालीन दृष्टिकोनातून आणि कठोर आर्थिक (नफा), सामाजिक (समुदाय) आणि पर्यावरणीय (प्लॅनेट) निकषांच्या आधारे घेतले जातात. कोरीस ला प्रामुख्याने तीन परिसंस्थांमध्ये (इकोसिस्टीम) शाश्वत मूल्य निर्माण करायचे आहे; त्या आहे जीवन विज्ञान (लाइफ सायन्सेस), ऊर्जा संक्रमण आणि ग्राहक जागरुकता. बेल्जियम, आणि लक्झंबर्ग येथील ३० जणांच्या प्रोफेशनल टीमच्या आधारावर हे लक्ष्य गाठण्याचा कंपनीला विश्वास आहे.

Historic Sahyadri Farms 310 Crore European Investment


Previous Post

संतापजनक! प्रियकराला झाडाला बांधून ठेवले, त्याच्यासमोरच प्रेयसीवर ५ जणांचा सामूहिक बलात्कार

Next Post

तोफखाना केंद्रीय विद्यालयात भारत स्काऊट गाईडच्या परीक्षण शिबिराची सुरुवात

Next Post

तोफखाना केंद्रीय विद्यालयात भारत स्काऊट गाईडच्या परीक्षण शिबिराची सुरुवात

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group