इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक मोठी घटना घडली आहे. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यालागत असलेल्या ओडिशाच्या केओनझार जिल्ह्यातील घाटगाव परिसरात एक गंभीर गुन्हा घडला आहे. पत्नीचे नातेवाईकाशीच अनैतिक संबंध असल्याचे समजल्याने पती संतप्त झाला. आणि त्याने पत्नीची हत्या केली आहे. मात्र, त्याने पत्नीच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकून पत्नीचा खुन केला आहे.
गावातील तिचा एक नातेवाईक महिलेच्या घरी आला होता. रात्री जेवण करून सर्वजण झोपायला गेले. मध्यरात्री पतीला जाग आली, तेव्हा त्याला पत्नी आपल्या बेडवर दिसली नाही. तो उठून दुसऱ्या खोलीत गेला. त्याने पाहिले की, त्याची पत्नी नातेवाईकासोबत अनैतिक संबंध करत आहे. यामुळे तो प्रचंड संतापला. रागाच्या भरात त्याने आधी पत्नीला मारहाण केली. त्यानंतर त्याने पत्नीच्या गुप्तांगात (प्रायव्हेट पार्टमध्ये) लोखंडी रॉड टाकला.
पत्नी जोरजोरात किंचाळ्या मारु लागल्याने पती घाबरला. यानंतर त्यानेच पत्नीला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. रुग्णालयातून पत्नीचा मृतदेह घेऊन तो घरी परतला. आता मृत्यूचे रहस्य उलगडणार, याची त्याला भीती वाटत होती. त्याला खुनाच्या आरोपाखाली पकडू नये म्हणून त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूला गुपचूप पुरला. मात्र खुनाची ही घटना लपून राहू शकली नाही.
घाटगाव पोलीस ठाण्याला कोठून तरी याबाबत माहिती मिळाली. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलीस घरी आले. पोलिसांनी प्रथम आरोपी पतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी पतीकडे कसून चौकशी केली असता त्याने पत्नीच्या हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. यानंतर मृतदेहही बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतर खून झालेल्या पतीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. स्थानिक न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
Crime Wife Murder Private Part Iron Rod
Jharkhand Husband