नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर भारतात विशेषतः नवी दिल्लीमध्ये चार माहिन्यांपूर्वी एका चोरट्याने ४० चाळीस कार चोरल्या होत्या, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आपली महागडी कार चोरी होऊ नये म्हणून प्रत्येक कार मालक काळजी घेतो, परंतु सध्या दोन कंपनीच्या कार सहजपणे चोरी जातात, असे एका अहवालावरून आढळून आले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे या कार आहेत त्यांनी या संदर्भात जाणून घेणे गरजेचे ठरते.
कार चोरणे अवघड तरीही… :
प्रत्येक चोरट्यांची काही वैशिष्ट्य असतात, असे म्हटले जाते. कुणी घरफोडी करून सोने-चांदी आणि रोख रकमेवर डल्ला मारतात, तर कोणी मोबाईल चोरतो तर काहीजण चक्क दुचाकी किंवा कारही चोरतात, खरे तर दुचाकी चोरणे एक वेळ सोपे, परंतु कार चोरणे ही इतकी सोपी गोष्ट नाही, तरीही चोरटे त्यावर कारवार डल्ला मारतात. दिल्लीत एका चोरट्याने ४० लक्झरी कार चोरी करण्यासाठी जीपीएस जॅमर, स्कॅनर आणि रिमोट कंट्रोल कार्ससहित अनेक गॅजेट्सचा वापर केला होता. चोरी केल्यानंतर गाड्या जास्त किमतीत विकल्या जात होत्या.
कारच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न
सध्याच्या काळात भारतीय बाजारपेठेत दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई आणि किया या दोन कंपनीच्या कारला मोठी मागणी आहे. नवीन कर खरेदी करणारे ग्राहक ह्युंदाई क्रेटा आणि कीया सेल्टोस दोन मॉडेलला अधिक पसंती देत असल्याचे देखील आढळून आले आहे. त्यामुळे ह्युंदाई क्रेटा व कीया सेल्टोस कारची मॉडेल्स भारतात कमी काळात खूप लोकप्रिय झाली आहेत. मात्र एका अहवालानुसार या दोन्ही कंपन्यांच्या कारच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ह्युंदाई आणि कियाच्या कार चोरट्यांसाठी लंपास करणे सहज शक्य असल्याचे उघड झाले आहे.
१ हजारपैकी एवढ्या चोरी
इन्शुरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टीच्या मते, इतर कंपन्यांच्या तुलनेत ह्युंदाई आणि किया च्या कार सहजपणे चोरीला जाऊ शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कारच्या या मॉडेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक इमोबिलायझर नाही. तसेच हायवे लॉस डेटा इन्स्टिट्यूटच्या अहवालात असे आढळून आले आहे की, ह्युंदाई आणि किया कंपनीच्या या कारची चोरी दरवर्षी १ हजार मॉडेल पैकी एक ते दोन मॉडेलची चोरी सहज होते. कारण चोरट्यांना त्या कार चोरणे काही अवघड ठरत नाही.
यामुळे चोरट्यांचे फावते
विशेषतः सन 2015 ते 2020 पर्यंतच्या मॉडेलची चोरी जास्त प्रमाणात होते, कारण यामध्ये काही दोष आणि त्रुटी आहेत. सन 1990 पासून काही वाहनांमध्ये चिपने सुसज्ज चाव्या सुरू करण्यात आल्या. त्यात ही चिप दुसर्या चिपशी जोडलेली नसते, त्यामुळे तेव्हा कार सुरू होत नाही. त्यामुळेच कोणत्याही चोरट्याला गाडीचे इंजिन सुरू करणे इतके सोपे नसते. तथापि, सन 2015 मध्ये, अन्य वाहन कंपन्यांच्या कारमध्ये 96 टक्के मॉडेलमध्ये इमोबिलायझर मानक होते. तर ह्युंदाई आणि किया कंपनीच्या केवळ 26 टक्के गाड्यांना इमोबिलायझर देण्यात आले होते. आता ह्युंदाई कंपनीचे म्हणणे आहे की, 1 नोव्हेंबर 2021 नंतर उत्पादित सर्व वाहनांसाठी मानक म्हणून इमोबिलायझर वापरण्यास सुरुवात केली आहे. तर किया कंपनी देखील सन 2022 मध्ये नवीन मॉडेल सादर केल्यानंतर आपल्या वाहनांमध्ये इमोबिलायझर्स प्रदान करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यानच्या काळात आणखी विशेष म्हणजे परदेशात काही ठिकाणी व्हायरल व्हिडीओमध्ये चोरांनी किआ आणि ह्युंदाईच्या कार कशा चोरल्या हे देखील दाखविले आहे. या व्हिडिओंमध्ये चोर ह्युंदाई आणि किया कंपनीच्या वाहनांचे इग्निशन कव्हर काढताना दिसत आहेत, त्यानंतर कार सुरू करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर किंवा USB केबल वापरताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्याकडे जर या दोन कंपन्यांपैकी एखाद्या कारचे मॉडेल असेल, तर चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी निश्चितच काळजी घ्यावी लागेल, असे दिसून येते.
Crime These Car Theft by Thieves report Says
Police Investigation